बीड जिल्ह्यात कृषी क्रांती होऊ घातलीय – एस.एम. देशमुख
– बीड मध्ये बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस चे उद्घाटन.
– डोंगरचा राजा / आँनलाईन
मागास जिल्हा, ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणारया बीड जिल्ह्यात तरूण शेतकरी शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.. फळ बागायतीचे क्षेत्र देखील वाढत आहे त्यामुळे येत्या काही वर्षात बीडमधील शेती क्षेत्राचा कायापालट झालेला दिसेल असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा कृषीमित्र एस.एम देशमुख यांनी व्यक्त केले..
के. जी. शाहीर आणि व्हि. जे धायगुडे यांनी सुरू केलेल्या *बळीराजा अँग्रो सर्व्हिसेस* या नव्या फर्मचे उद्घाटन काल एस.एम.देशमुख यांच्या हस्ते झाले त्यावेळी देशमुख बोलत होते..
देशमुख पुढे म्हणाले, के. जी. शाहीर यांनी जिल्ह्यातील असंख्य शेतकरयांना शेतीत नवे प्रयोग करण्यास प्रोत्साहीत केले, अगदी मोफत मार्गदर्शन देखील केले.. त्यामुळे अनेक शेतकरयांनी आधुनिक शेतीची कास धरली.. कमी खर्चात, कमी पाण्यावर शेती कशी करायची हे शाहीर यांनी नव्या पिढीला समजावून सांगितले त्याचा फायदा जिलहयाला होत आहे.. बळीराजा अग्रो सर्हिसेसच्या माधयमातून शाहीर हे काम आता अधिक नेटाने करतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त करून नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.. बीड जिल्हयातील कृषी क्षेत्रात होत असलेले बदल माध्यमांनी जगासमोर आणले पाहिजेत असे आवाहन देशमुख यांनी केले..
आत्मा से प्रकल्प संचालक श्री.सुभाष साळवे,ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन नवी दिल्लीचे अध्यक्ष श्री.मनमोहन कलंत्री, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी श्री.एच.डी गरंडे,तालुका कृषी अधिकारी श्री.बी.आर.गंडे , कृषी भुषण दत्ताजी जाधव,प्रगतशील शेतकरी श्री.कल्याण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी सुभाष साळवे, मनमोहन कलंत्री आदिंनी मनोगत व्यक्त केले..
यावेळी शाहीर यांच्या वतीने सर्वांचा यथोचित शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमासाठी विनायक परझणे , सिध्दु गाडे,शेख सर ,वाय जनार्धन राव ,सचिन सुस्कर ,डॉ सचिन पवार ,उद्धव तळेकर ,कासट ,अनेक कंपनीचे प्रतिनिधी ,अनेक शेतकरी , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार के.जी.शाहीर व व्हि.जे.धायगुडे यांनी मानले.