निविष्ठा विक्री केंद्र व कार्यालयाचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

0
108

निविष्ठा विक्री केंद्र व कार्यालयाचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

बीड – वडवणी येथे विधाका शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत निविष्ठा विक्री केंद्र व कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व प्रोत्साहन अंतर्गत दीनदयाळ शोध संस्था कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कंपनीची स्थापना करण्यात आली असून या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना बी -बियाणे व कृषी निविष्ठा आदीची विक्री व पुरवठा केला जाईल. 

या कार्यक्रमासाठी माजलगाव उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , नायब तहसीलदार जरांगे, पोलीस निरीक्षक ए एस कांगुणे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे,तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.उपेंद्र कुलकर्णी , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक पी. एल. मायकर, गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे यासह विविध अधिकारी , नागरिक व शेतकरी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here