आ.धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश.
– डोंगरचा राजा / आँनलाईन
– परळी वैद्यनाथ उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी 6 कोटी रुपये मंजूर
परळी वैद्यनाथ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथील उपजिल्हा रुग्णालया च्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडे वारंवार मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 6 कोटी 19 लाख रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.
याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून, लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यायला येणाऱ्या रुग्णांची संख्या, त्यांना उपचार मिळण्यासाठी आवश्यक बाबी आदींचा विचार करून इमारतीची दुरुस्ती, डागडुजी व्हावी तसेच काही बाबींचे नुतनीकरण करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी शासनाकडे वारंवार मागणी केली होती.
त्यानुसार आरोग्य विभागास प्राप्त प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, 6 कोटी 19 लाख 9 हजार रूपयांचा एकूण आराखडा मंजूर करण्यात आला आहे, या निधीतून उपजिल्हा रुग्णालय आणखीनच उपयुक्त होणार असून, यासाठी धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.