अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

0
101

अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

– वडवणी तहसीलवर आंबेडकरी जनतेचा आक्रोश मोर्चा.

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

वडवणी – नांदेड शहरापासून जवळच असलेल्या बोंढार हवेली या ठिकाणी भीम जयंतीची मिरवणूक काढली म्हणून गावातीलच स्वतःला सुवर्ण समजणाऱ्या मस्तवाल जातीयवाद यांनी अक्षय भालेराव या उमद्या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला असून नामांतराच्या लढ्यापासून आजपर्यंत सडके जातीवादी मानसिकतेतून अनेक उमद्या आंबेडकरवादी तरुणांना स्वतःचा जीव गमावावा लागला आहे. या घटनेने जेवढे मस्तवाल मुजोर जातिवादी हत्यारे जबाबदार आहेत.तेवढेच जातीयता आणि धर्मांधतेला प्रोत्साहन देणारे राज्य कर्तेही जबाबदार आहेत. त्यामुळे जातीवादी लोकांना बळ मिळते. म्हणून बोंढार हवेली हे गाव जातीचा माज असलेले जातीवादी गाव गुंडाचे गाव असून या गावात दर वर्षाला दोन चार ॲट्रासिटीच्या केसेस घडतात. म्हणून आज दिनांक 8 /6/ 2023 रोजी वडवणी तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष, संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले आहे. या अगोदरही बौद्ध वस्तीवर याच गावातील जातिवादी हत्या-यांनी सन 2016 मध्ये संपूर्ण विहाराची तोडफोड केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती काढू दिली जात नव्हती. म्हणून यावर्षी बोंढार गावातील भीमसैनिकांनी या मयत अक्षय भालेराव याने पुढाकार घेऊन भीम जयंती साजरी केली. बोंढार

गावात भीम जयंती झालीच कशी याची चीड मनात ठेवून हे जातीचा माज असलेले बिन्डोक मोठ्या हल्याची तयारी करूनच होते. आणि तो दिवस एक जून ठरला. यात निष्पाप असणाऱ्या अक्षय भालेराव चा या गावगुंडांनी चाकुने भोसकून क्रूरतेने

खून केला. या मयत अक्षयच्या आई आणि भावालाही चाकूने दगडाने मारहाण केली. नंतर बौद्ध वस्तीवर दगडफेक करून हल्ला करून दहशत निर्माण केली. म्हणून याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक खासदार,आमदार,शिवसेना जिल्हाप्रमुख बोंढारकर यांनी सात जातीवाद्यांना वाचण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करून प्रशासनावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु या भागातील भीमसैनिकांनी प्रशासनाच्या छातीवर बसून संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनला थांबून अक्षय भालेराव खून करणाऱ्या ९ आरोपींना अटक होईपर्यंत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत भीमसैनिक संबंधित पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. माजलेल्या जातीवादी आरोपींवर 302,307,324,323,249,504,143,147,148 149,4,25,27 ॲट्रासिटी ॲक्ट 3(1) (r),3(1)(s),3(2)(va) या कलमांद्वारे गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणून वडवणी तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने देखील या मागण्यांची अंमलबजावणी करून मयत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन करून फाशीची शिक्षा देऊन मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा.यासह आदी मागण्यांसाठी वडवणी तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने भालेराव खून प्रकरणातील या प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.यामध्ये मयत अक्षय भालेराव याच्या कुटुंबीयांना तातडीने पन्नास लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, अक्षय भालेराव याचा भाऊ आकाश यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,अक्षय भालेराव निर्गुण खून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे,बोंढार गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी तात्काळ पोलीस चौकीची स्थापना करावी,मयत अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी,अक्षय भालेराव याच्या मारेकऱ्यांना फाशीचे शिक्षा देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन वडवणीच्या तहसील प्रशासनाकडे देण्यात आले असून या निवेदनावर भाई महादेव उजगरे, रिपाइं चे महादेव उजगरे, जिल्हाध्यक्ष राजेश घोडे,ॲड भास्कर उजगरे, राजू वाघमारे, राजेश उजगरे, शाम उजगरे,अविनाश साळवे, सुनील वाघमारे, रामेश्वर वाघमारे,विष्णू मुजमुले,आदर्श मुजमुले,सचिन आवचर, प्रकाश तांगडे, दिलीप आवचर, संजय साळवे ,सतीश डोंगरे, शाम उजगरे, उद्धव आव्हाड, रोहित आवाड, प्रदिप आवाड, बाबासाहेब राऊत, बबन मांजरे,महादेव उमाप,अप्पासाहेब मुजमुले युवराज शिंदे,दीपक उजगरे,अश्वजीत उजगरे, हनुमंत डोंगरे,किशोर डोंगरे,विजय डोंगरे,अनिल उजगरे,दिलीप रोकडे, सुरेश उजगरे,किरण उजगरे, प्रदिप उजगरे,सुधाकर हातागळे,विठ्ठल जावळे,दीपक जावळे,बळीराम जावळे,शहादेव जावळे,दीपक जावळे,शिवाजी जावळे,जीवन जावळे,सम्यक जावळे,बाळू जावळे,आकाश जावळे,विश्वास जावळे,लखन जावळे,लहू खारगे,

गोविंद डोंगरे,रोहित डोंगरे,भैय्यासाहेब डोंगरे,दिलीप कांबळे,बाळू जावळे सर्जेराव आवचर, अतुल लोणके, बाळासाहेब लोणके यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here