उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातून पाणी सुटणार – आ.प्रकाश सोळंके
– कुंडलिका मध्यम प्रकल्पातून कुंडलिका नदीपात्रात उद्यापासून पाण्याचा विसर्ग होणार !
उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे उपळी,कुप्पा,लोणवळ,बाबी,दुकडेगाव,चिंचाळा,परडीमाटेगाव,केडेपिंप्री ता.वडवणी या गावांसाठी पाणी सोडणेबाबत शिफारस केली होती.त्या अनुषंगाने कुंडलिका मध्यम प्रकल्पातून(उपळी) कुंडलिका नदीपात्रात उद्या दि.२४ मे २०२३ पासून पाणी सोडण्यात येणार आहे.याचा उपयोग नागरिकांसाठी,जनावरांसाठी होईल.प्रकल्पाखालील विहिरी,बोअर रिचार्ज होऊन पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.