महाराणी ताराबाई विद्यालयाचे विद्यार्थी धाईतिडक,सावंत,बडे,घुमरे नीट परीक्षेत चमकले..
डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी येथील,महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले कु.प्रिती शिवाजी धाईतिडक,चि.कृष्णा राम सावंत,चि.अजय लक्ष्मण बडे व कु.प्रतिक्षा रामनाथ घुमरे हे चौघेही नीट परीक्षेत यशस्वी झाले असून त्यांनी आपला एमबीबीएस साठी वैद्यकीय प्रवेश चांगले गुण घेऊन निश्चित केला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या नीट वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेमध्ये कु.प्रिती शिवाजी धाईतिडक यांनी ५९० गुण घेऊन तसेच चि.कृष्णा राम सावंत यांनी ५८६ गुण घेऊन व चि.लक्ष्मण अजय बडे यांनी ५५६ गुण घेऊन तर कु.प्रतिक्षा रामनाथ घुमरे यांनी ५४६ गुण घेऊन आपला एमबीबीएस साठी वैद्यकीय प्रवेश निश्चित केला आहे या यशाबद्दल संस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव तथा मा.आ.श्री.केशवराव आंधळे तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेभाऊ वारे,उपाध्यक्ष श्री.संजयभाऊ आंधळे,संचालक तथा युवा उद्योजक मा.श्री.रंजीतभैय्या धस,इंजिनीयर श्री.अशोकभैय्या आंधळे, विद्यालयाचे प्राचार्य मा.राऊत डी.डी.,उपप्राचार्य मस्के सर,पर्यवेक्षक श्री.धाईतिडक सर,अर्थ विभाग प्रमुख श्री.डोईफोडे सर,मराठी वांग्मय विभाग प्रमुख श्रीमती शोभाताई आंधळे मॅडम,श्री.अशोक तांबडे सर यादींजणांनी अभिनंदन करून कौतुक केले व पुढील शैक्षणिक उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.