चिखलबीडच्या गोविंदने नीट परीक्षेत मिळवले ६५० गुण
– डोंगरचा राजा / आँनलाईन
लातूर येथील आयआयबी क्लासेस मध्ये शिक्षण घेत असणारा गोविंद बालासाहेब मुंडे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत 650 गुण घेऊन यश संपादन केले आहे.त्यास आयआयबीचे प्राध्यापक चिराग यांचे खूप मोठे मार्गदर्शन मिळाले. गोविंदने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये एक नंबर वर असलेल्या आयआयबी क्लासेस चा विद्यार्थी चिरंजीव गोविंद बालासाहेब मुंडे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेमध्ये 650 गुण घेऊन मोठे यश संपादन केले आहे.वडील बालासाहेब मुंडे हे शेती करतात.शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करून ते आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी पाठबळ देत आहेत.वडिलांच्या कष्टाचं चीज गोविंद ने केले आहे.त्याने नीट परीक्षेत 650 मार्क्स घेऊन मोठे यश संपादन केले आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.