पी एम कुसुम सोलार योजनेचा शेतकऱ्यांनी घ्यावा फायदा – अनुस्पर्श फाऊंडेशन.
पाथर्डी/प्रतिनिधी
गेल्या 15 दिवसापासून कुसुम योजेने मधून सोलार पंप करीता अर्ज प्राप्त करणे सुरू झालेले आहे. या योजनेमार्फत 90% अनुदान केंद्र व राज्य शासन मिळून देते. या मधून शेतकऱ्यांना ऐन पिकाच्या वेळी येणाऱ्या लाईटच्या समस्येला तोंड देणे टाळता येत आहे त्यामुळे ह्या कुसुम योजेनेला भरपूर असा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तसेच महाऊर्जा ने देखील पंपाचा कोठा वाढवला आहे. याकरता शेतकऱ्यांना अर्ज https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर दाखल करायचा असून शेतकऱ्याच्या ७-१२ उताऱ्यावर विहीर/बोअरवेल/शेत तलाव जमीन आवश्यक आहे, जमिनीच्या क्षेत्रा नुसार सोलार पंप ची निवड केली जाते. १ एकर क्षेत्रा पर्यंत ३ Hp पंप, ५ एकर पर्यंत क्षेत्रासाठी ५ Hp पंप आणि ५ एकर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर ७.५ Hp पंप मिळू शकतो.
नोंदणी करताना जो गट नंबर टाकला जाईल त्याच ठिकाणी सोलार पंप बसविला जातो.
योजने करीता आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) ७-१२ उतारा ( विहीर/बोअरवेल/शेत तलाव नोंद आवश्यक)
3) बँक पासबुक
४) पासपोर्ट फोटो
५) जातीचा दाखला ( Sc/ST करीता)
६) समंतीपत्र ( सामाईक क्षेत्र/विहीर असल्यास).
⭕👉नोंदणीसाठी फक्त १५ रुपये फी आकारली जाते त्यामुळे कोणत्याही एजंटला किंवा अतिरिक्त फी करीता शेतकऱ्यांनी बळी पडू नये.
विनाकारण आपली काही ठिकाणी फसवणूक होऊ शकते त्यामूळे शेतकऱ्यांनी सावधगिरीने राहून या योजनेचा फायदा घ्यावा अशी अनुस्पर्श फाऊंडेशन च्या वतीने विनंती आहे.