अंबेजोगाई साखर कारखाना बिनविरोध;रमेशराव आडसकरांचा दबदबा कायम..

0
105

अंबेजोगाई साखर कारखाना बिनविरोध;रमेशराव आडसकरांचा दबदबा कायम..

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

– ऋषीकेश आडसकर,डॉ.अनिल किर्दंत व मिनाज पठाण या नविन तरुणांना रमेश आडसकरांनी दिली सुवर्ण संधी.

अबांजोगाई – अंबासाखर सारखी मोठी सहकार क्षेत्रातील संस्था पुन्हा भाजपा नेते रमेशराव आडसकरांनी ताब्यात घेतली आहे.केज व अंबाजोगाईच्या राजकारणाची दिशा ठरविणारा हा कारखाना असुन शेतकरी व शेत मजुरांना पुन्हा न्याय देण्यासाठी आडसकर नेहमीच सक्रीय राहिलेले आहेत.या कारखाना निवडणुकीसाठी २१ जागेसाठी ऐकुन ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी ऐकुन १२ जणांनी माघार घेतली.यात कारखान्याचे होणारे चेअरमन आणी माजलगाव विधानसभा मतदार संघाचे नेते मा. रमेशराव आडसकर,पुतने युवानेते मा.ऋषीकेषभैय्या आडसकर सह २१ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.या मध्ये १)आडसकर रमेशराव बाबुराव २) श्री.ऋषीकेष प्रकाशराव आडसकर ३) श्री.लाड लक्ष्मीकांत महादेवराव ४) श्री.औताडे राजाभाऊ भगवानराव ५) श्री.पाटील दत्तात्रय झानोबा ६)श्री.शिनगारे विजय रामराव ७)श्री. सोळंके बाळासाहेब यशवंत ८) श्री.शेरेकर मधुकर विश्वंभर ९ ) डॉ.किर्दन्त अनिल शिवाजीराव.१०) श्री इंगळे संभाजी बब्रूवान.११) श्री.कदम जीवन रामराव.१२)श्री.जगताप लालासाहेब बाळासाहेब .१३)श्री.कातळे आनिल भगवानराव१४)श्री. देशमूख विठ्ठलराव संभा साहेब .१५) श्री.जाधव प्रमोद चंद्रकांतराव .१६) श्री.देशमुख गोविंद बालासाहेब .१७ ) श्री. गायकवाड अशोक भगवानराव .१८) श्री. पठाण मिनाज .१९) श्री. पिंगळे रमाकांत बाळासाहेब .२०) सौ. साखरे भगिरथीबाई बंकटराव .२१) सौ.शिंदे वच्छलाबाई वासुदेव हे २१ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. खासदार प्रितमताई मुंडे,माजी ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे यांनी रमेशराव आडसकर व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here