वाडीया चौक मोबस कंपाउंड येथे चोवीस दिवसांपासून आंदोलन
डोंगरचा राजा/आँनलाईन
पुणे / प्रतिनिधी
वाडीया चौक मोबस कंपाउंड येथे चोवीस ते पंचवीस दिवसांपासून चालू असलेल्या व्यवसायिक आणि रहिवासीयांच्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मा.आमदार जयदेवराव गायकवाड यांनी आंदोलन स्थळी येऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. फायनल प्लॉट नंबर 246 बंडगार्डन रोड पुणे या सरकारी मिळकतीमध्ये रहिवासी लोक सत्तर वर्षे पेक्षा अधिक व्यावसायिक 40 वर्षापासून वास्तव्यास असून या सर्व लोकांना पुणे शहर तहसीलदार व या सरकारी जमिनीच्या भूखंडाचा गैरव्यवहार करणारी व इतर इसमाने न्यायालयाची व शासनाची कोणती परवानगी नसताना भ्रष्ट मार्गाने खरेदी विक्री सरकारी सर दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदविले आहे ही बाब आंदोलकांनी लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी व पुणे शहर तहसीलदार यांना वारंवार सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून येथील व्यवसायिकांना दिनांक 11/7/2024 रोजी अतिक्रमण कारवाई करून उध्वस्त केला आहे या केलेल्या चुकीच्या कारवाईचा आमदार जयदेव गायकवाड यांनी या सर्व भ्रष्ट मार्गाने केलेल्या कारवाईचा व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. चळवळीचे नेते मुरलीधर जाधव आंदोलनाचे समन्वयक शैलेंद्रजी मोरे ,दीपक अण्णा गायकवाड, श्रीनाथ कांबळे, बालाजी कुऱ्हाडे, माऊली भोसले प्रदीपदादा ओव्हाळ,अजित शेख,मंदार रायकर , रोहित मांढरे अब्दुल शेख, विजय खुडे,संदीप शेंडगे गोविंद पाटणकर कार्तिक कानडे इत्यादी कार्यकर्त्यांसह विविध पक्ष संघटनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.