पोलीस दलामध्ये भरती झालेल्या मुला मुलींचा सन्मान सोहळा..
नुकत्याच झालेल्या पोलीस भरती 2023 चा निकाल लागल्याने जाटदेवळे या खेड्या गावातील
(१) पवार बिभीषण सखाराम ( मुंबई पोलीस दल)
(२) बहिरवाळ निवृत्ती विष्णु (पुणे पोलीस दल)
(३) राठोड योगेश रामनाथ ( मुंबई पोलीस दल)
(४) नाकाडे योगेश खंडू (रायगड पोलीस दल)
(५) सोनाळे रूपाली मिठू ( मुंबई पोलीस दल)
(५) कु.बहिरवाळ संध्या बबन (मुंबई पोलीस दल)
यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या तसेच दररोज कष्ट करून जगणाऱ्या या गरीब परिवारातील मुला-मुलींनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे मुलांनी मिळवलेल्या यशाचा आदर्श बाकीच्या तरुण-तरुणी घ्यावा. अनुस्पर्श फाउंडेशन नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करीत असते
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळावी आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या इतर मित्र मैत्रिणींना मार्गदर्शन करावे आणि सेवेमध्ये मिळालेली ड्युटी योग्य पद्धतीने पार पाडून आपले तसेच आपल्या गावाचे नाव उज्वल करावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी राजेंद्र पवार, निवृत्ती घोशीर, विठ्ठल आठरे, व मुला मुलींचे पालक, गावातील ग्रामस्थ व इतर राजकीय, सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते