आता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’
– या योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येणार
डोंगरचा राजा विशेष वृत्त..
महाराष्ट् शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयामानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र ईद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधीत ठेवण्यासाठी राज्यांमध्ये ‘मुख्यमंत्री वयश्री योजना’ राबविण्यात येत आहे तसेच या योजनेसाठी पात्र असणा-या सर्व लाभार्र्थ्यानी अर्ज भरण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती श्रीमती जय श्री सोनकवडे, प्रादेशिक उपयुक्त, समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.
सदर योजनेचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
उद्दिष्ट
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीr जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र,योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधीत ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकरकमी रुपये 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहेत.
सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील. दुधाच्या उदा: चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड,स्ट्रीप व्हील चेअर,फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची,नी-ब्रेस, लॉबर बेल्ट,सर्वालकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणी कृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले हे योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल.
पात्रता
दिनांक 31 नोव्हेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत, उत्पन्न-लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक 2 लाखाच्यात असावे. याबाबत लाभार्थ्यांने घोषणापत्र सादर करावे. सदर व्यक्तींनी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सामाजिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण प्राप्त केलेले नसावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, मतदानकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. स्वयंघोषणपत्र. इतर शासकीय ओळखपत्रे. ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या योजनेसाठी या विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समिती स्थापन झालेल्या असून अर्ज स्वीकारणारे तसेच छाननी करण्याची कार्यवाही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे