वडवणीत संतसेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

0
111

वडवणीत संतसेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

डोंगरचा राजा / आँनलाईन

अभुतपुर्व मोटारसायकल रॅलीने वडवणीकरांचे लक्ष वेधले.

वडवणी – नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतसेना महाराज यांची जयंती वडवणी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम शिवरत्न जिवाजी महाले चौकात वडवणी पोलिस ठाण्याचे पीएसआय प्रमोद यादव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य दिव्य अशी अभुतपुर्व मोटारसायकल रॅली काढण्यात आली.संतसेना महाराज की जय च्या जयघोषाने वडवणी नगरी दुमदुमून गेली.
संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन केले व संतसेना महाराज यांच्या प्रतिमेची रथातून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य दिव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक,जिवाजी महाले चौक, संविधान चौक, वसंतराव नाईक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौक विश्वकर्मा चौक मार्गे संतसेना महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली.यावेळी ओबीसीचे नेते संदिप बेदरे, नगराध्यक्ष शेषेराव जगताप,कॉंग्रेसचे नेते दादासाहेब मुंडे, माजी नगरसेवक सतीश बडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास राजाभाऊ मुंडे, दिनकरराव आंधळे,दिनेश मस्के, विनोदकुमार नहार,जेष्ठ नेते बुवासाहेब शिंदे,अंकुश शिंदे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे,शिवसेनेचे नेते विनायक मुळे,माजी सैनिक माळवदे,रतन पाटील शिंदे ,भाई महादेव उजगरे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष महादेव उजगरे, अमोल आंधळे, धनराज मुंडे,श्रीराम मुंडे,सुग्रीव मुंडे, आत्माराम जमाले,अमरसिंह मस्के,ईश्वर तांबडे, बी.एम.पवार,अंकुश पेशवे, रामेश्वर सावंत, भास्कर उजगरे,अनुरथ मस्के,शिवाजी तौर,आदि. सामाजिक,राजकीय,व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसीचे नेते युवराज शिंदे यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकार जगदीश गोरे यांनी केले तर आभार प्राचार्य डी.डि.राऊत यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज शिंदे, गुलाबराव राऊत, एस.एन.राऊत,वसंत भैरे,परमेश्वर राऊत,बबन भैरे, कृष्णा काळे‌, रामप्रसाद चव्हाण, भागवत शिंदे, माऊली राऊत, संतोष काळे,अर्जुन राऊत, सारंग चव्हाण, वचिष्ट राऊत ,विश्वास राऊत, अनिल जाधव,अतुल राऊत,अमोल राऊत, संतोष भैरे यांनी परिश्रम घेऊन सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here