कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कृषी 314 लाभार्थींना 2 कोटी रुपये निधी मंजूर

0
75

कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कृषी 314 लाभार्थींना 2 कोटी रुपये निधी मंजूर

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

– राज्याच्या 5% निधी बीड जिल्ह्यात.!

– मंगळवार पासून होणार लाभाचे वितरण.

बीड – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यातील ट्रॅक्टर व अन्य औजारांच्या प्रलंबित 314 लाभार्थींच्या सुमारे 2 कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली असून, डीबीटी द्वारे हा निधी बीड जिल्हा कृषी विभागास प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील ट्रॅक्टरच्या 94 तर अन्य ट्रॅक्टर चलीत औजारांच्या 220 मागण्या अशा एकूण 314 लाभार्थींच्या सुमारे 2 कोटी रुपये निधीचे वितरण मंगळवार पासून थेट लाभार्थींना करण्यात येणार आहे.

कृषी अभियांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ट्रॅक्टर सह रोटावेटर, पलटी नांगर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, कडबा कुटी, पाचट कुटी, मोगडा आदी औजारांसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतून मंजूर अनुदानाच्या सुमारे 5% अनुदान यावर्षी एकट्या बीड जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

बीड हा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा असून कृषी खात्यांतर्गत सर्व योजनांचा लाभ राज्या सोबतच बीड जिल्ह्याला ही सर्वाधिक मिळावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. यापूर्वीही पिक विमा असो व अन्य योजनांच्या माध्यमातून सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here