वडवणी शहरात होणार खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण..

0
76

वडवणी शहरात होणार खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण..

-डोंगरचा राजा / आँनलाईन

– मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार दि.२३ जानेवारी पासून खुल्या प्रवर्गाचे वडवणी शहरात सर्व्हेक्षण…

वडवणी – मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार दि.२३ जानेवारी पासून मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील इतर समाजाचे पण सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात येणार असून वडवणी नगरपंचायत हद्दीत सदरील सर्व्हेक्षण करण्यासाठी 39 प्रगणक व 3 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून, या सर्व्हेक्षणासठी मर्यादित कालमर्यादा देण्यात आली असून हे सर्व्हेक्षण दि.23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत पुर्ण करावयाचे असल्याने खुल्या प्रवर्गातील जे जे समाज व जाती येतात या सर्व लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामी नियुक्त केलेल्या कर्माची अधिकारी यांना सहकार्य करुन लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करावी, जेणेकरून राज्य मागासवर्ग आयोग सर्व माहिती शासनास तात्काळ सादर करील ,
सर्वेक्षणाच्या अनुषंगाने वडवणी शहरातील मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील सर्व समाजाच्या नागरिकांनी आपली योग्य माहिती प्रगणक कर्मचाऱ्यांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन वडवणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री.चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here