फक्त निवडणूकीपुरते दारात येणाऱ्याला थारा देऊ नका – सुरेश धस

0
21

फक्त निवडणूकीपुरते दारात येणाऱ्याला थारा देऊ नका – सुरेश धस

– डोंगरचा राजा/आँनलाईन

आष्टी विधानसभा मतदार
संघाच्या निवडणूकीचा भाजपा शिवसेना रिपाई या महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. आष्टी मतदार संघात अनेक खेळी खेळल्या जात असून हा फक्त मला रोखण्याचा डाव असून राज्यात महायुती असूनही या मतदार संघातच घड्याळ निशाणी का दिली ? या सर्व खेळी कशासाठी ? हे सर्व सुज्ञ आणि समजदार असलेली जनता समजून घेत असून हा फक्त एका माणसाला रोखण्याचा डाव असून विकास कामासोबत सुखदुःखासह आपल्यात सदैव 365 दिवस हजर असून केवळ निवडणूक लागली की आपल्या दारात येणाऱ्याला थारा देऊ नका अशी प्रतिक्रिया महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री सुरेश धस यांनी केली.
231,आष्टी-पाटोदा-शिरुर का. विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना- रि.पा.ई. (आ) आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून ते गावभेट दौऱ्यात बोलत होते.
यावेळी माजी आमदार सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, 1997 पासून मी आपल्या मतदारसंघात जनसेवेचे काम करत असून गेले दहा वर्षापासून तुमचा लोकप्रतिनिधी नाही तरीसुद्धा विधान परिषदेमध्ये संधी मिळाल्याने मी काही ना काही आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामासोबत सुखदुःखातही मी आपल्या हजर राहिलो आहे तुम्ही जे निवडून दिले ते गेल्या पाच वर्षात किती वेळा तुम्हाला तुमच्या दारात आलेत आणि जे आता अपक्ष म्हणून उभा आहे ते किती वेळा तुमच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात जर माझे कुटुंब तुमच्या संपर्कात असेल तरच मला मतदान द्या कोरोना काळ असो किंवा बिबट्या काळ इतरत्र कोणतीही गोष्ट असो मी आपल्या 24 तास 365 दिवस सेवेत राहून तुमची सेवा केली आहे संकटकाळी इथले आमदार कुठे गेले होते विधानसभेचे मतदान झाल्यानंतर आता तुमच्या दारात येतील आणि मतदान मागतील अशा मतदार अशा लोकांना थारा देऊ नका माझ्या दारात येणारा मोकळ्या हाताने कधीच जाऊन दिलेली नाही असे का मी गेल्या अनेक दिवसांपासून जनसेवेत करत आहे मात्र या निवडणुकीत मला महायुतीचे तिकीट मिळाले असताना माझ्या झोपेत दोघं दगड धोक्यात आणण्याचे काम राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून करण्यात आले आहे हे कितपत योग्य असून याचा निर्णय जनताच घेईल आता मी माझी आष्टा गट ही आई समजत असून 1999 सारखी परिस्थिती झाली आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून कराची परतफेड करणे करायची नव्हती फार करतानीच भाषणात तुम्हीच काय भाषा होती हे जनतेने पाहिला आहे मतदारसंघात कामाचा कुठेच फक्त नारळ एवढं कोटी मंजूर करून बोर्ड लावायचं काम यांनी केले आहे मी आयुष्यात प्रशासकीय ऑर्डर असल्याशिवाय कोणत्याच कामाचा नारळ फोडलेला नाही आणि विरोधक काम झालं नाही की म्हणायचं सूर्यदर्शन ते होतच नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही मात्र आता ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून 2004 सारखा निकाल लागेल भावना माजी आमदार सुरेश यांनी केले आहे.
आष्टी विधानसभा संघातील प्रचाराच्या पहिल्या दिवशी 231 आष्टी-पाटोदा-शिरुर का. विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना-रि.पा. ई. (आ) आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांनी वनवेवाडी,मातावळी, मातकुळी, चिंचपुर,आष्टा ह.ना.,वाळुंज, इमनगाव,पारगाव जो.,रुटी,बळेवाडी, खानापुर,खडकत,सांगवी आष्टी, टाकळसिंग,हिंगणी,दैठणा, हनुमंतगाव, चिखली,मंगरुळ या गावामध्ये गावभेट दौऱ्याकरून मतदारांशी संवाद साधत साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी आष्टा गटातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी, शिवसेना रिपाई आठवले गट व सर्व घटक मित्र पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह गावागावातील वाड्या,वस्ती, तांड्यावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
***************
जनतेनेच धस यांची निवडणूक घेतली हाती
*************************
आष्टी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आली असून माजी आमदार सुरेश धस यांच्या विजयासाठी गावोची गावे एकवटले असून कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हातात घेत धस यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
जनतेनेच धस यांची निवडणूक घेतली हाती असल्याचे चित्र आष्टी मतदार संघात पाहायला मिळत असून सदैव सर्वांच्या सुखदुःखात हजर असा लोकाभिमुख नेता पुन्हा विधान सभेत पाठवायचा आहे अशी गावागावातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.त्यांना प्रचंड बहुमताने या निवडणुकीत विजयी करावे अशा भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here