धनंजय मुंडेंच्या वतीने उद्या परळीतील श्री टॉकीज मध्ये वर्ल्ड कप फायनलचे मोफत थेट प्रक्षेपण..
– परळी वासीयांनी या सामन्याचा लाईव्ह थरार अनुभवावा.
परळी वैद्यनाथ – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील ‘श्री टॉकीज’ येथे उद्याच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या फायनल मॅचचे थेट प्रक्षेपण परळी वासीयांसाठी करण्यात येणार असून, येथे विनामूल्य प्रवेश दिला जाईल.
भारतीय क्रिकेट संघाने लीग व उपांत्य असे सर्व सामान जिंकत या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथम स्थानी राहून आपला दबदबा कायम राखला आहे. आपल्या समोरील कोणत्याही संघाला भारताविरुद्ध विजयाच्या जवळपास देखील फिरकू दिले नाही, त्यामुळे आता फायनल सामन्यासाठी भारतीयांची उत्सुकता शिगेला गेली आहे.
धनंजय मुंडे हे क्रिकेटचे अत्यंत प्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संकल्पनेतून परळी शहरातील श्री टॉकीज मध्ये उद्याचा वर्ल्ड कप फायनल मॅच मोफत लाईव्ह दाखवण्यात येणार असून, दुपारी 12.30 पासून येणाऱ्यांना मोफत प्रवेश दिला जाईल, श्री टॉकीज मध्ये सुमारे 200 पेक्षा अधिक लोकांची बघण्याची व्यवस्था उपलब्ध आहे; अशी माहिती श्री टॉकीजच्या संचालकांनी दिली आहे.