आ.प्रकाश सोळंके यांच्याकडून वडवणीकरांना बंप्पर दिवाळी भेट.

0
156

आ.प्रकाश सोळंके यांच्याकडून वडवणीकरांना बंप्पर दिवाळी भेट.

डी पी प्लॅनसह व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या ई-लिलावास शासनाची मान्यता.

डोंगरचा राजा / आँनलाईन 

सर्व वडवणीकरांसाठी मागील बऱ्याच वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न बनलेल्या व शहराच्या ऐन मध्यवस्तीत शासनामार्फत नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील ८९ गाळ्यांचा लवकरच ई-लिलाव होवून येथील व्यापाऱ्यांना तीन-चार नव्हे तर तब्बल ३० वर्षांच्या दिर्घ मुदतीवर सदरील गाळे देण्यास शासनाची मान्यता मिळाली असून त्याच पध्दतीने वडवणी शहराचा शहर विकास आराखडा म्हणजेच डी.पी.प्लॅनला देखील शासनाने मंजुरी व मान्यता दिलेली आहे. दरम्यान माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विकास पुरुष आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या माध्यमातून समस्त वडवणीकरांना दिवाळीपूर्वीच वरील दोन्ही स्वरुपातून बंप्पर दिवाळी भेट मिळाली असेच या निमित्ताने म्हणावे लागेल.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या वडवणी शहराची विकासातून समृध्दीकडे वाटचाल सुरु असून माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा विकास पुरुष म्हणून ज्यांना गौरविले जाते अशा आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या माध्यमातून वडवणी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नुकताच कोट्यावधी रुपयांचा विकास निधी काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेला आहे. त्या माध्यमातून वडवणी शहराचे रुपडे पालटण्यासाठी स्थानिक नगरपंचायतीचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत असून यात आता दुग्ध शर्करा योग म्हणजे सर्व वडवणीकरांसाठी मागील बऱ्याच वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न बनलेल्या व शहराच्या ऐन मध्यवस्तीत शासनामार्फत नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील सर्व ८९ गाळ्यांचा लवकरच ई-लिलाव होवून येथील व्यापाऱ्यांना तब्बल ३० वर्षांच्या दिर्घ मुदतीवर सदरील गाळे भाड्याने देण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी सन २०२० मध्ये सदरील ८९ गाळे फक्त ३ वर्ष मुदतीवर देण्यास शासनाची मान्यता मिळाली होती. तसेच या गाळ्यापोटी अनामत रक्कम व त्या गाळ्यांचे भाडे व्यापारी वर्गाला न परवडणारे होते. याचाच विचार करुन त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी या निर्णयाला स्थगिती आणली होती. व वडवणी शहरातील व्यापारी बांधवांना परवडेल अशा स्वरुपातच सदरील गाळे देण्याची प्रक्रिया पार पाडू असा विश्वास आमदार सोळंके यांनी वडवणी शहरातील व्यापाऱ्यांना दिला होता. या अनुषंगाने आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणीकरांना दिलेला हाच विश्वास सार्थ ठरवत वडवणी नगरपंचायतीवर दादांची निर्विवाद सत्ता स्थापन झाल्यानंतर सर्व व्यापारी बांधवांना परवडेल अशा स्वरुपाची गाळे लिलावाची प्रक्रिया शासनाकडून मंजूर करुन घेतली आहे. व्यापारी बांधवांना सदरील गाळे ३ वर्षांऐवजी थेट ३० वर्षांसाठी देण्यात यावेत व यासाठी लागणारी अनामत रक्कम व गाळ्यांचे भाडे हे माफक दरात असावेत यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी मागील ३ वर्षांपासून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या याच पाठपुराव्याला आता शत प्रतिशत यश मिळाले असून शासनाकडून त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली एक त्री-सदस्यीय समिती स्थापन करुन त्यांच्या मार्फत अनामत रक्कम व गाळा भाडे रक्कम याचे योग्य मूल्यांकन निश्चित करुन लवकरात लवकर ई-लिलाव पध्दतीने सर्व गाळ्यांचे वाटप नियमानुसार करण्यात येईल अशी ग्वाही वडवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.वंदनाताई शेषेराव जगताप यांनी याप्रसंगी दिली. दरम्यान वडवणी नगरपंचायतीने सदरील सर्व गाळे भाडेतत्त्वावर दिल्यानंतर नगरपंचायतीच्या दरडोई उत्पन्नात देखील मोठी वाढ होईल व याचा थेट फायदा वडवणी शहराच्या विकासासाठी होईल. तसेच सध्या शहरात प्रचंड वाढलेली भाडेवाढ यामुळे निश्चितपणे रोखली जाईल व ती कमी होवून सर्वसामान्य व्यापाऱ्यांना यातून दिलासा मिळेल. सर्व गाळे पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर वडवणी शहराच्या बाजारपेठेला पूर्व वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील तितकेच सत्य आहे. त्याच पध्दतीने वडवणीकरांचा दुसरा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शहर विकास आराखडा म्हणजेच डी.पी.प्लॅनला देखील शासनाने मंजुरी देवून मान्यता दिली असून या शहर विकास आराखड्याला मंजुरी दिल्याने वडवणी शहरासाठी आणखी नवनविन प्रकल्प येण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. शासनाकडूनही यासाठी मोठा भरीव निधी मिळणार असून वडवणी शहरातील जागेची ले-आऊट करण्यासाठीची फीस पूर्वी ५ टक्के या दराने आकारण्यात येत होती मात्र आता ही फीस केवळ ०.५० टक्के एवढ्या अत्यल्प प्रमाणात आकारली जाणार आहे. त्याच पध्दतीने वडवणी शहरातील प्रलंबित असलेले बसस्थानक, मोठे रस्ते यांसह इतर सर्व नागरिकांसाठीच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी यामुळे निश्चितपणे हातभार लागणार आहे. ज्या जागा विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या आहेत त्या सर्व जागा संपादित करुन त्या जागांवर विकास कामांसाठी शेकडो कोटी रुपयांचा भरीव निधी येत्या काळात आणला जाणार आहे. एकंदरीत वरील दोन्ही वडवणीकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आता मार्गी लागले असून माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या माध्यमातून समस्त वडवणीकरांना आगामी दिवाळी सणापूर्वीच वरील दोन्ही स्वरुपाची बंप्पर दिवाळी भेट ही दिवाळीपूर्वीच मिळाली असून यामुळे वडवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, सर्व नगरसेवक तसेच वडवणी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी याबाबत मनस्वी समाधान व्यक्त करत आमदार प्रकाश दादा सोळंके यांचे विशेष करुन आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here