कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होताच परळीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
– फटाके फोडून व पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव*
– डोंगरचा राजा/आँनलाईन
महाराष्ट्रा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून, धनंजय मुंडे यांच्या विकासकार्याचा व निर्णयांचा धडाका व कामाचा उरक पुन्हा एकदा जिल्हा वासीयांना अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती घोषित होताच परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे एकत्रित येऊन जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
ना.धनंजय मुंडे हे कार्यतत्पर नेते आहेत. लोकांची कामे करणारे विकसनशील नेतृत्व म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाचा झंझावात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे यांना मागील सरकारच्या काळात पालकमंत्री पद मिळाले आणि काही दिवसातच कोविडचे भयावह संकट सबंध जगासह बीड जिल्ह्यातही येऊन धडकले. मात्र तशा परिस्थितीत देखील धनंजय मुंडे यांनी उत्कृष्ट नियोजन करत जिल्ह्यातील जनतेची सेवा केली. आरोग्यासह संकटात असलेल्या शासकीय तिजोरीतून देखील धनंजय मुंडे यांनी त्या काळात बीड जिल्ह्यात निधीची कमतरता न भासू देता विकासकामांचा धडाका कायम ठेवत कठीण काळातील सक्षम पालकत्व सिद्ध केले होते. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा विकास कामांना गती येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बीड जिल्हा उपाध्यक्ष सुरेशआण्णा टाक,माजी उपनगराध्यक्ष आयुब भाई पठाण,रवींद्र परदेशी,नगरसेवक अनिल अष्टेकर,विजय भोईटे,राजेंद्र सोनी अजित कच्ची,केशव गायकवाड,नितीन रोडे, शंकर आडेपवार माजी नगरसेवक महेंद्र रोडे रवी मुळे,जालिंदर नाईकवाडे,अनंत इंगळे,दत्ताभाऊ सावंत,रामेश्वर महाराज कोकाटे वैजनाथराव बागवाले रमेश अण्णा भोईटे,शंकर कापसे,राजेश फड,जितेंद्र नव्हाडे, संजय देवकर,तक्की खान,रमेश मस्के अभिजीत धाकपाडे, जावेद कुरेशी,दीपक देशमुख बळीराम नागरगोजे, ज्ञानेश्वर होळंबे,उमेश दहिफळे,दीपक कुरील सुरेश नानावटे,शकील कच्छी,धोंडीराम धोत्रे,मजास इनामदार राजू भाई,विशाल चव्हाण,प्रदीप जाधवर यांसह आदी उपस्थित होते.