लोकनेते सोळंके कारखाना ६ लाख ४५ हजार मेट्रिक टन गाळप पूर्ण !

0
15

लोकनेते सोळंके कारखाना ६ लाख ४५ हजार मेट्रिक टन गाळप पूर्ण !

डोंगरचा राजा / आँनलाईन

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचा ६ लाख ४५ हजार मेट्रिक टन गाळप पूर्ण.गळीत हंगाम २०२३-२४ सांगता समारंभ गव्हाण पूजन माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाले.

दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षीचा हंगाम हा अतिशय आव्हानत्मक होता.तरी या कठीण परिस्थितीत देखील ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप पूर्ण झाले याचे समाधान आहे. ऊसतोड वाहतूक ठेकेदारांना प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्षी सन्मान म्हणून बक्षीस देण्यात येते.ट्रॅक्टर,मिनी ट्रॅक्टर,बैलगाडी, हार्वेस्टर मशीन,गाडीवान विविध प्रकारातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा यावेळी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

मागील ३१ हंगामात आजतागायत कुठल्याही शेतकऱ्यांचा एक ही रुपया कारखान्याने बुडवला नाही.पुढेही कधी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.मागील हंगामातील १५० रुपयांचा राहिलेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि हक्काचा १५० रुपयांचा हप्ता दिला जाईल एवढी ग्वाही या निमित्ताने आ प्रकाश सोळंके यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here