धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी मंत्री – क्रिडामंत्री ना.संजय बनसोडे

0
134

धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी मंत्री – क्रिडामंत्री ना. संजय बनसोडे

– परळीत होत असलेल्या ऐतिहासिक राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

– क्रीडाशिक्षक व खेळाडूंचा पुरस्कारांनी यथोचित सन्मान.

– डोंगरचा राजा / आँनलाईन

परळी येथे मंजूर करण्यात आलेले क्रीडा संकुल परिपूर्ण करणे ही माझ्यासाठी एक जबाबदारी आहे. त्याचबरोबर या क्रीडा संकुलासाठी निधी कमी पडू देणार नाही. ना. धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी मंत्री असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक मंत्री ना संजय बनसोडे यांनी परळी येथे सांगितले. परळी येथे होत असलेल्या ऐतिहासिक राज्यस्तरीय आर्चरी धनुर्द्या स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे प्रथमच महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन, बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन व बीड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीयआर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा (वरिष्ठ गट) ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी क्रिडा शिक्षकांना जीवनगौरव व खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.महाराष्ट्र आर्चरी (धनुर्विद्या) असोसिएशनच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार असून परळीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून महाराष्ट्राची नॅशनल आर्चरी टीम निवडली जाणार आहे.या स्पर्धेत राज्यभरातून सहाशे खेळाडू सहभागी झाले आहेत.फाऊंडेशन स्कूल प्लेग्राऊंड, परळी वैजनाथ येथे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या स्पर्धा होत आहेत. शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ सायं. या स्पर्धेचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

ना. संजय बनसोडे (क्रिडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन संजय दौंड (माजी आमदार), राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा.कॉ. पाटी, बीड), श्रीमती. सुहासिनी देशमुख (जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड), त्रिंबक कांबळे (मुख्याधिकारी न.प. परळी ) नायब तहसीलदार रुपनर,वैजनाथ सोळंके (तालुकाध्यक्ष रा.काॅ. परळी वै.) अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, शिवाजी सिरसाट, गोविंद देशमुख, लातूरचे माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे,विजयप्रकाश तोतला (अध्यक्ष-चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट),सौ. गीतांजली कुलकर्णी (कै. प्रमोद महाजन इंग्लीश स्कूल) आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी व बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन चे सचिव शैलेश कुलकर्णी यांनी केले. या सौहळ्यात परळीत क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दत्ताप्पा ईटके,सुभाष नाणेकर व अमर देशमुख या क्रिडा शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड,ऋतुजा गर्जे, सानवी सचिन सौंदळे, सूर्या सचिन सौंदळे,शुभम मुंडे, वैष्णवी लक्ष्मण गवारे,चैतन्य चिद्रवार,मनस्वी मुंडे,आभा गणेश मुंडे,राजाराम शेळके,वैष्णवी वैजनाथ जीगे,रेहान बाबू नंबरदार,सचिन शेळके,शिवदास घुले, विशाल मुंडे, राजू घुले, शंकर नागरगोजे, नितीन स्वामी,शंकर वाकडे, नामदेव मुंडे,बालाजी फड,बालाजी मुंडे, गोविंद मुंडे,कपिल बेलापट्टे, सूर्यकांत कोहाळे,ओम मेनकुदळे, रिलस्टार साईराज केंद्रे, पत्रकार शहादत अली या परळी व परिसरातील विविध खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व विविध क्रीडास्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण यश प्राप्त केलं आहे अशा खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

प्रारंभी संजय सुरवसे सर व परळीतील विद्यार्थिनींनी मान्यवर व खेळाडूंचे स्वागतगीताच्या माध्यमातून स्वागत केले.दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करुन सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्राची समृद्ध परंपरा दाखवणारं राज्यगीत सादर करण्यात आले.तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती देणारा पोवाडा अनंत मुंडे यांनी सादर केला. के.जी.एफ मध्ये संगीत दिलेला ओंकार रापतवार या कलाकाराने आपली ड्रमची कला सादर केली. या सोहळ्यात राजेश्वर चव्हाण,प्रमोद चांदूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.तर सत्कारमुर्तींच्या वतीने दत्तप्पा ईटके गुरुजी यांनी सत्काराला उत्तर दिले. अजय जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, स्पर्धक क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धा व उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी स्वागताध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्यासह प्रशांत देशपांडे (अध्यक्ष महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन), प्रमोद चांदुरकर (सचि महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन),राजेश कराड( अध्यक्ष बीड जिल्हाआर्चरी असोसिएशन), शैलेश कुलकर्णी (सचिव बीड जिल्हाआर्चरी असोसिएशन), एस.पी. मुंडे (तालुकाध्यक्ष शारीरीक शिक्षक संघ), विलास आरगडे (शहराध्यक्ष शारीरीक शिक्षक संघ) व परळी तालुका शारिरीक शिक्षक संघटना आदी अथक परिश्रम घेत आहेत.

 

■ *धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिल्या कार्यक्रमाला शुभेच्छा*

दरम्यान, या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदार संघात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आल्याने व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ना. धनंजय मुंडे यांना उपस्थित राहावे लागले यामुळे परळीतील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाप्रती आपल्या सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या. परळी शहरात क्रीडा विषयक राज्यस्तरीय स्पर्धा होत असून ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगून या उपक्रमात पुढाकार घेणारे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी व सर्व आयोजकांचे, सहकाऱ्यांचे धनंजय मुंडे यांनी कौतुक केले. तसेच जीवनगौरव पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांना व सन्मान प्राप्त परळी व परिसरातील सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here