आ.धनंजय मुंडेंचा सोमवारी परळीत जनता दरबार

0
130

आ.धनंजय मुंडेंचा सोमवारी परळीत जनता दरबार

– नागरिक-कार्यकर्त्यांना भेटून समस्यांचे निवारण करणार, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भरणार जनता दरबार

परळी वैद्यनाथ (दि. 25) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे हे परळी वैद्यनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार असून, या जनता दरबारात ते नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नेहमीप्रमाणे त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील.

आ. धनंजय मुंडे यांचे ‘लोक भेटतील तिथे जनता दरबार’, या पद्धतीने कामकाज चालते. परळी वैद्यनाथ मतदारसंघातील नागरिकांसाठी ते कितीही व्यस्त असले तरीही प्रत्येक आठवड्यात राखीव वेळ ठेवतात. त्यांच्या जिथल्या तिथे काम मार्गी लावण्याच्या खास शैलीमुळे नेहमीच त्यांच्या जनता दरबारात नागरिक व कार्यकर्त्यांची हाऊस फुल गर्दी दिसून येते.

दरम्यान नागरिक व कार्यकर्त्यांना भेटून त्यांची कामे, समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने धनंजय मुंडे हे सोमवारी दि. 26 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह, परळी वैद्यनाथ या ठिकाणी जनता दरबार उपक्रमांतर्गत उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. धनंजय मुंडे यांच्या जनसंपर्क कार्यलयाच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here