१० हजाराची लाच घेताना वडवणीत पोलिस पकडला.
– डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी – येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दहा हजाराची लाच घेताना जेरबंद झाला आहे. सदरील या लाचखोर पोलिस कर्मचार्यां विरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गंगावणे यानी एन सी निकाली काढण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागीतली.मात्र तडजोडी अंती ही रक्कम दहा हजार ठरली. सदरील तक्रारदाराने बीड एसीबी कडे तक्रार न करता उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्याने लाचेची पडताळणी केली. आणि आज दुपारी दहा हजाराची लाच घेताना हा लाचखोर वडवणी पोलिस ठाण्यातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्या जाळ्यात अडकला.