वडवणीत विवाहित महिलेची विहिरीत उडी टाकून आत्महत्या .

0
101

वडवणीत विवाहित महिलेची विहिरीत उडी टाकून आत्महत्या .

-डोंगरचा राजा/आँनलाईन

वडवणी शहरातील महादेव मंदिर परिसरातील विहिरीत एका ३७ वर्षीय विवाहित महिलेनी उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. १० मे रोजी घडली आहे. या घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.
तसेच या घटनेची माहिती वडवणी पोलीसांना मिळताच वडवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे व इतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्या महिलेने स्वतःची चप्पल आणि मोबाईल विहिरीच्या कडेला ठेवला होता. वडवणी पोलीसांनी महिलेच्या मोबाईलवरुन डायल नंबरवर फोन करुन महिलेची ओळख पटवली असून बाजाच्या सहाय्याने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला होता. अंजना विठ्ठल नाईकनवरे (वय ३७ वर्ष) रा. गोपाळ नगर वडवणी असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी पंचनामा केला असून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला होता. सदरील महिलेच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्यापपर्यंत समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वडवणी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.
वरील घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here