मातोश्री हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने मोफ त आरोग्य तपासणी.
– डोंगरचा राजा / आँनलाईन
हृदय, किडनी, लिव्हरसंबंधी 33 तपासण्या होणार.
बीड – येथील मातोश्री हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ बीडच्या संयुक्त विद्यमाने मोफ त आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर आज दि.24 ते 26 मार्च असे तीन दिवस सकाळी 10 ते 3 या वेळेत होणार आहे.
शहरातील तुळजाई चौक, कॅनॉल रोड भागात असलेल्या मातोश्री हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त ग्लोबल जीन कार्पोरेशन व रोटरी क्लब ऑफ बीडच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह, हृदयरोग, किडनी व लिव्हर विकार, दमा रुग्णांसाठी सीबीसी, ईएसआर, एचबीए1 सी, लिव्हरच्या 10 टेस्ट, हृदयासंबंधी 7 तपासणी, किडनीसंबंधी 5 तपासणी, थॉयरॉईड संबंधी 3 तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये रक्तदाच्या एकूण 33 टेस्ट असून यासाठी जवळपास 4 हजार 500 रुपये खर्च येतो. या सर्व टेस्ट या शिबीरात पूर्णपणे मोफ त केल्या जाणार आहेत. दररोज 100 रुणांची रक्त तपासणी केली जाणार असून याकरिता पूर्व नाव नोंदणी बंधनकारक आहे. तपासणीसाठी येतांना आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत घेवून यावे असे आवाहन डॉ.अमोल जोगदंड, डॉ.मिनल जोगदंड, डॉ.बालाजी नवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव प्रा.सुनिल जोशी, प्रोजेक्ट चेअरमन संतोष पवार यांनी केले आहे.
———–