विद्यार्थ्यांनो, यू शुड नाॅट लिमिट – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे

0
110

विद्यार्थ्यांनो, यू शुड नाॅट लिमिट – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

मराठवाड्यातली मराठी मुल ,माझ थोडक्यात हुकलं, या परीघा बाहेर पडून कधी विचार करणार, तेच ते आणि तेच ते. हुकलं , हा डायलॉग कशाला ? असा रोकडा सवाल बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी अंबाजोगाई येथील वसुंधरा प्रतिष्ठान, आयोजित विद्यार्थ्यी मेळाव्यात बोलताना विचारला आहे.

जिल्हाधिकारी मुंडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, गोड गोड बोलून कौतुक करणाऱ्यां पासून सावध राहीले पाहिजे. उलट, तोंडावर झापणारी, अभ्यासाच्या चुका आपल्या तोंडावर सांगून फॅक्ट सांगणारे खरे मित्र असतात.विद्यार्थ्यांचे वय ही एक अशी गोष्ट आहे की, तुम्ही त्या वयात काहीही करू शकता. तुम्ही ते ठरवल पाहिजे. तुमच्यात इच्छा शक्ती असली पाहिजे. स्पर्धेत भाग घेत रहा. स्पर्धा परीक्षेत सातत्य आवश्यक असते. एक दोन प्रयत्न करून, यश पदरात पडत नसते. येथेच चुकते, आपण अपयश आले की, सोडून देतो. पून्हा म्हणायला मोकळे, माझे एक दोन मार्काने हुकले. अरे, कसे काय हुकले. का केले नाही. हे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे रडगाणे, डायलॉग मला माहित आहेत. असे सांगून, त्या पुढे म्हणाल्या, कारणे सांगत बसू नका. फाईट करा. ज्ञानोबारायांनी एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली ? मराठवाड्यातून मराठी साहित्याचा जन्म झाला. हे शक्ती केन्द्र आहे. त्या स्थानाला ओळखा आणि कोणत्याही क्षेत्रात तुमच मेरिट दाखवा. आई-वडीलांवर ओझ होऊन कशाला वागता, तुमच तुम्ही बघा. शेती विकू नका. शिकायला शेती विकायची काय गरज ? त्या पेक्षा मेरीट ला चॅलेंज करा. जे ठरवल ते करायची बौद्धिक ताकद दाखवून करिअर उभ करता येते. आम्ही सुद्धा तुमच्या सारख्याच साधारण घरातून आलोत. कलेक्टर, तहसीलदार व्हायचंय म्हणून, शेती विकायची, नौकरी मिळावायची आणि मग आई-वडीलांना घरातून बाहेर काढायचे, या पापाचे धनी होऊ नका. ही माती पवित्र आहे. तिची आब राखून स्वतःच अस्तित्व तयार करा.नौकरीसाठी शिकू नका. खूप पेस आहे. त्यावर, तुमचे भविष्य उभ राहील. एवढेच नाही, शंभर लोकांना रोजगार देऊ शकाल, एवढी ताकद दाखवून देता यायला वाव आहे. इंजिनियर झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःची कंपनी सुरू करावी. पाच-दहा लाखापासून सुरूवात करा. राष्ट्रीय बॅन्क आहे. तुमचे सिब्बील चांगले पाहिजे. ते असूनदेखील बॅन्क न- ना करीत असेल तर आमच्याकडे या, असे आवाहन ही त्यांनी केले. लहान वयात लग्न करू नका. आधी करिअर मग संसार, चौदा-पंधरा वर्षाचे असतानाच लग्न करू नका. करिअरवर स्वतःच पाणी टाकता. हे वास्तव ही त्यांनी मांडले.लहान असतानाच शिकता येते. चांगली शेती करा. मी ट्रॅक्टर चालवते. शिकले मी. कोणती गोष्ट कधी उपयोगात येईल, सांगता येत नाही. चौकट ओलांडून काम करण्याची गरज आहे.ऑऊट ऑफ बाॅक्स थिंकिंग, या दृष्टिकोनातून कार्यरत व्हावे लागेल. विद्यार्थ्यांनो गो,आऊट…! बिकाॅज ,यू शुड नाॅट लिमिट..! असे आवाहन ही जिल्हाधिकारीसौ. मुंडे-मुधोळ केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here