माजी विद्यार्थ्यांची २० वर्षांनी पुन्हा भरली शाळा.
– १९९७ ते २००३ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा
डोंगरचा राजा / आँनलाईन
वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. पस्तीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते आष्टी तालुक्यातील तालुका ठिकाण ची श्री गणेश विद्यालय आष्टी चे इयत्ता पाचवी ते दहावी वर्ग ब तुकडी च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा गेट टु गेदर कार्यक्रम आष्टी येथील श्री गणेश विद्यालयात १९९७ ते २००३ वर्षातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे गेट टु गेदर स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक ०२.०५.२०२३ रोजी आष्टी येथील श्री क्षेत्र गणेश विद्यालय या ठिकाणी पार पडले. या गेट टु गेदर स्नेहसंमेलनात ७८ विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश विद्यालया चे माजी मुख्याध्यापक व दहावी वर्ग ब तुकडी चे वर्ग शिक्षक लहु करपे हे होते तर प्रमुख पाहुणे शिक्षक त्रिंबक इजारे , शिक्षक वामन निकाळजे , शिक्षक रमेश भगत , शिक्षक नवनाथ मोरे , दत्तात्रय करडकर,दातार सर , शिक्षक सुषमा पोकळे हे उपस्थित होते .यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष लहु करपे म्हणाले की २० वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला. सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत तुमचा दहावी चा निकाल लागला आणि आपली शाळा नविन ईमारती मध्ये स्थलांतरित झाली मी तुमचा दहावी चा वर्गशिक्षक होतो सर्व विद्यार्थी यांना चांगले ज्ञान देण्याचे काम केले व वर्ग ब तुकडीतिल सात विद्यार्थी हे उच्च पदावर गेले हा मला अभिमान वाटतो यावेळी इजारे सर , निकाळजे सर,मोरे सर,करडकर सर, दातार सर, पोकळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचा फेटा बांधून पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांढरी येथिल अशोक वांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंडलिक वाल्हेकर, मारोती हनुवते यांनी केले तर मनोगत संदीप रोंढे यांनी व्यक्त केले.तर सूत्रसंचालन शिक्षिका पोकळे सुषमा यांनी केले तर आभार अशोक वांढरे यांनी मानले .