राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकासाठी लिंबागणेश येथे रास्ता रोको..
डोंगरचा राजा / आँनलाईन
अहमदनगर -अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डी मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता मोरगाव फाटा,मुळुकवाडी,लिंबा गणेश बसस्थानक, भालचंद्र माध्यमिक विद्यालय,महाजनवाडी फाटा,वैद्यकिन्ही,सौंदाना, सोनेगाव फाटा व ग्रामीण रूग्णालय पाटोदा याठीकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.४ मे गुरुवार रोजी सकाळी १०वा लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.निवेदन पोलिस उपनिरीक्षक नेकनुर पोलिस स्टेशन पानपाटील, पोह.डिडुळ, खांडेकर,खटाने, क्षीरसागर, ढाकणे,मंडळ अधिकारी वंजारी, तलाठी पोतदार, कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक राजेभाऊ आप्पा गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, लेहनाजी गायकवाड सुरेश निर्मळ , विक्रांत वाणी, अशोक वाणी,दादा गायकवाड, हरिओम क्षीरसागर जितेंद्र निर्मळ, तुळशीराम पवार, स्वप्निल वक्ते,अजय थोरात, शंकर निर्मळ आदि.सहभागी झाले होते.
गतिरोधक नसल्याने भालचंद्र विद्यालयातील शालेय मुलांची सुरक्षा धोक्यात
लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर असुन गतिरोधक नसल्याने त्यांच्या सुरक्षितता धोक्यात आली असून वारंवार याठिकाणी अपघात घडत आहेत. यापुर्वीही दि.२८आगस्ट २०२१ रोजी भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी गतिरोधकाची मागणी करत अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून “श्रद्धांजली गांधीगिरी”आंदोलन केले होते.
बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती आंदोलनात सामील ,
—
शालेय मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामूळे आजच्या आंदोलनात बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती महाराज सामिल झाले होते.आंदोलना दरम्यान आजारी रूग्णाला रस्ता मोकळा करून दिला.