ब्रम्हवाडी गावात विकासाची गंगा – धनंजय मुंडे

0
163

ब्रम्हवाडी गावात विकासाची गंगा – धनंजय मुंडे

– जलजीवन मिशन योजनेतील 45 लाखांच्या पाणी पुरवठा योजनेसह हनुमान मंदिर सभागृह, गावांतर्गत रस्त्यांचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ.

परळी वैद्यनाथ / प्रतिनिधी

ब्रह्मवाडी गावाला विकासापासून वंचित राहू देणार नाही, आज या गावात घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ होत आहे; त्याच बरोबर येथील हनुमान मंदिराच्या सभागृहाचे काम देखील आपण सुरू करत आहोत. ग्रामस्थांना दिलेला तो शब्द होता. गावांतर्गत सिमेंट रस्त्याचे ही काम हाती घेतले आहे. एकूणच आता गावात विकासाची गंगा येत आहे, असे प्रतिपादन आमदार धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ तालुक्यातील ब्रह्मवाडी येथे बोलताना केले आहे.

परळी वैद्यनाथ तालुक्यातील ब्रह्मवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 45 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे तसेच येथील हनुमान मंदिराच्या सभागृहाचे व गावांतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले; याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी मागील काही दिवसात परळी मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून गावोगावात दौरे सुरू केले असून, प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट हाती घेऊन ते साध्य काम करत आहेत. पिण्याच्या पाण्याची 100% सोय करणे यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

मतदारसंघात सत्ता असो वा नसो, आपण दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू, त्यासाठीही कुठेही निधीची अडचण भासू देणार नाही, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, सूर्यभान नाना मुंडे, माऊली तात्या गडदे, पिंटू मुंडे, माऊली मुंडे, गोविंद बबनराव फड, श्रीकांत फड, गोवर्धन कांदे, संदीपान मुंडे, भीमा डावरे, अच्युतराव चव्हाण, विनायकराव राठोड, सौ.सुनीता गायकवाड, मधुकर मुंडे, नंदकुमार गित्ते, संजय ढाकणे, बालाजी गित्ते, सतिश गावडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here