पं.नेहरूंच्या लोकशाहीवादी धोरणामुळेच भारताचा विकास झाला.
– राष्ट्रीय परिषदेतील तज्ञांचा सुर.
सिरसाळा /प्रतिनिधी
येथील श्री पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा व कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय, वसुंधरा महाविद्यालय घाटनांदूर, जनविकास महाविद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने दी. १५ एप्रिल रोजी सोनपेठ येथे पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र भारताचे लोकशाहिकरण या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या उद्घाटन समारोहाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, तर उद्घाटक प्राचार्य डॉ. आर.टी. बेद्रे, बीजभाषक तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाश पवार (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) मंचावर मा. योगेश कदम, प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ. हरिभाऊ कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व पत्रकार शिवमल्हार वाघे हे उपस्थित होते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्य भारताचे लोकशाहीकरण या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, या वेळी स्वातंत्र्य भारताच्या सुरूवातीला पंडित नेहरूंच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय धोरणांमुळे भारत हा जगातील प्रगतशिल देश म्हणून पुढे आला व जागतिक स्तरावर भारत एक विश्वासू नेतृत्व म्हणून अलिप्ततावादी राष्ट्रांच्या चळवळीत जगाला दिसून आले. नेहरूंच्या धोरणातील तरतुदींवर साधक – बाधक विचार मांडण्यात आले. नेहरूंच्या संपूर्ण धोरणामध्ये लोकशाही मुल्यांची पेरणी करणारे, त्या मूल्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न असायचा, असा सुर तज्ञांच्या मतामधून मांडला गेला.या राष्ट्रीय परिषदेसाठी ८१ लेख व १०३ सहभागीतांनी सहभाग नोंदवला, कार्यक्रमाच्या संत्रांमधून दोन सत्रात डॉ.रत्नाकर लक्षेटे, चेअरमन राज्यशास्त्र अभ्यास मंडळ,स्वा.रा.म.वि.नांदेड, डॉ.संजय गायकवाड सदस्य राज्यशास्त्र अभ्यास मंडळ स्वारातिमवि नांदेड यांनी साधन व्यक्ती म्हणून व्याख्यान दिले, सत्तावीस संशोधकांनी आपले शोधनिबंधाचे सादरीकरण केले.समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम उपस्थित होत्या. चर्चासत्राचे संयोजन प्रा. जोगदंड एम. बी., प्रा. डॉ. तिडके के. डी., प्रा. डॉ. गोरे ए. एल, प्रा. दिक्षित एस. डी., प्रा. डॉ. राजेश गायकवाड यांनी केले.या राष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सखाराम कदम, स्वागतपर भाषण प्राचार्य हरिभाऊ कदम, प्रास्ताविक प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये तर आभार प्रा.डाॅ.बापुराव आंधळे यांनी मानले.