अखेर ७३ वर्षांनंतर फुकेवाडी ग्रामस्थांचा प्रश्न मिटला.
– अखेर ७३ वर्षांनंतर फुकेवाडी ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आणि शाळा, आरोग्य,बाजारहटाचा प्रश्न मिटणार.
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील पिंपरनई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत फुकेवाडी हे ५०० लोकसंख्या असणारं डोंगर द-यात नदीच्या काठी वसलेले गाव . बहुतांश ऊसतोड मजूर आणि डोंगर द-यातील सिताफळ,लिंबु आदि.रानमेवा विकुन पोट भरणारी . देशाला स्वातंत्र्य मिळुन ७३ वर्ष झाली परंतु रस्त्याची सुविधाच नाही,ग्रामस्थांच्या निवेदन, आंदोलनानंतर अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत इजिमा ११५ ते फुकेवाडी रस्ता सुधारणा करणे एकुण लांबी २.५ किलोमीटर असुन अंदाजे किंमत १६८.७७ लक्ष असुन डी.बी. कन्स्ट्रक्शन मार्फत रस्ता कामाला सुरुवात झाली असून ओढ्यावरील पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे.त्यामूळे ७३ वर्षांनंतर दळणवळणाचा प्रश्न मिटणार आहे.
शाळा,दवाखाना, बाजारहाट यासाठी ओढ्यावर पुल आणि रस्ता अत्यावश्यक
—-
फुकेवाडी ग्रामस्थांना दवाखाना, बाजारहाट तसेच ४ च्या पुढील शिक्षणासाठी लिंबागणेश येथे जाताना ३ किलोमीटर डोंगर चढून जाण्याची कसरत करावी लागते परंतु त्याच बरोबर पावसाळ्यात ओढ्याला पुर आल्यानंतर लिंबागणेशला जाण्यासाठी अडचण येत असे, मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत असे प्रसंगी शाळेत जाता येत नसे त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असे.
ग्रामस्थांच्या आंदोलनाचे यश:- डॉ.गणेश ढवळे
—
फुकेवाडी ते लिंबागणेश रस्ता अत्यावश्यक असुन तातडीने काम करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१९ जुन २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते तसेच वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दि.१४ आक्टोबर २०२२ रोजी जिल्हा प्रशासना मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले होते.