जेजूरकर साहेब, जरा बांधावर जाऊन नुकसानीचा आढवा घ्या! – अशोक सुरवसे
– डोंगरचा राजा / आँनलाईन
कर्मचारी कमी असल्याचे सांगत शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष – अशोक सुखवसे
बीड – येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर हे बीडला रुजू झाल्यापासून कर्मचारी कमी आहेत, अधिकारीच नाहीत असे नेहमीच सांगत असतात. परंतु स्वतः मात्र कार्यालय सोडून शेतकर्यांच्या बांधावर जावून कधी पाहणी करतांना दिसले नाहीत. ठराविक लाभाच्या योजना राबविण्यातच त्यांचा वेळ जात असून नुकत्याच झालेल्या गारपिटीनंतर जिल्हाधिकार्यांनी स्वतः बांधावर जावून पाहणी केली. कृषी अधिकारी मात्र केबीनच्या बाहेरच न निघाल्याने शेतकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी कारभार न सुधारल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आता रब्बी हंगामाची पिके काढणीला आलेली असतांना गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाभरात 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षातील नुकसान यापेक्षा अधिक आहे. याबरोबरच फ ळबाग धारक शेतकर्यांना गारांमुळे मोठा फ टका बसला असून याचे नुकसान कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. अशा स्थितीत एक जबाबदार अधिकारी म्हणून कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी थेट बांधावर जावून शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेत किमान धीर देणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता केवळ वैयक्तिक लाभाच्या काही योजना राबविण्यातच त्यांचा वेळ जात असून यातून कोणाला लाभ होतोय, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. कृषी अधिकार्यांनी कारभार न सुधारल्यास शेतकर्यांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी दिला आहे.
———-