रस्त्यांची अर्धवट कामे करुन गुत्तेदार फरार.
अतुल बडे / सिरसाळा
– बांधकाम विभाग अधिका-यांचे दुर्लक्ष ,रस्त्यांची दैनिय अवस्था, नागरिकांचे हाल
– डिग्रस-पोहनेर, कोथरुळ-गोवर्धन रस्ता प्रकरण
सिरसाळा रस्ता काम करणा-या गुत्तेदारांनी बोगस पणाची हद्द पार केली आहे.सिरसाळा परिसरातील डिग्रस-पोहनेर व कोथरुळ-गोवर्धन ह्या रस्त्यांची अर्धवट कामे करुन पुर्ण कामांचे बिले उचलून संबंधित गुत्तेदार फरार झाला आहेत. या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. पाच वर्षा पुर्वी पोहनेर-डिग्रस रस्त्याचे काम झाले परंतु संबंधित गुत्तेदाराने सदर रस्त्याचे नुसते बीबीएम केले आहे. अद्याप यावर डांबर अस्थरीकरण, डांबरी सिलकोट टाकले नाही. रस्त्याचे पूर्ण काम न करताच पुर्ण बिल उचलेले गेल्याची माहिती आहे. सद्या ह्या रस्त्याची खुप दैनिय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून रस्ता उखडल्या गेला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येतो. दूसरी कडे कोथरुळ-गोवर्धन हा ८ किमीचा रस्ता गुत्तेदाराने डांबरी सिलकोटचे काम न करताच सोडून दिला आहे. काम पूर्ण न करताच संबंधित गुत्तेदाराने कामाचे पुर्ण बिल उचलले आहे. सदर रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. बिग बजेट असलेला रस्त्या खड्डे मय झाला असून पुर्ण उखरला गेला आहे.रस्ता साईड भागाचे काम केले नसल्याने काटेरी बाभूळ झाडांचा विळखा रस्त्याला बसला आहे. यावरुन रहदारी करणे आवघड झाले आहे. झुडपा मुळे वळणात समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
हा रस्ता जिल्हा परिषद चे बांधकाम विभाग अंतर्गत येतो.
● जिल्हाधिकारी मॅडम लक्ष द्याच :
ग्रामीण भागातील रस्त्यांची गुत्तेदारांनी पार वाट लावली आहे. ग्रामीण भागातील विकासात दर्जेदार रस्ते खुप महत्त्वाचा भाग आहे. पंरतु ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे गुत्तेदारांकडून निकृष्ट दर्जाची तर केलीच जातात आणि पुर्ण कामे न करताच अर्धवट अवस्थेत सोडून दिली जातात.या मुळे रस्ते सतत खराबच राहतात.कोथरुळ-गोवर्धन,
डिग्रस-पोहनेर रस्ता कामे अर्धवट सोडून सदर कामांचे पुर्ण बिले उचलून गुत्तेदार फरार झाले आहेत. संबंधित विभाग तर लक्ष देत नाही,कार्यवाही करत नाही म्हणून जिल्ह्याधिकारी मॅडम आपण या कडे एकदा लक्ष द्याच अशी मागणी होत आहे.