रोटरी क्‍लब ऑफ बीडच्या वतीने बायपास रोडवर नामफलकाचे अनावरण

0
139

रोटरी क्‍लब ऑफ बीडच्या वतीने बायपास रोडवर नामफलकाचे अनावरण

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – सोलापूर-धुळे महामार्गाच्या चौपदरी करणानंतर बीड शहराबाहेरुन बायपास रोड झाला आहे. या ठिकाणाहून शहराकडे प्रवेश करतांना कोणताही फ लक नसल्याने नव्याने या भागात येणार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेवून रोटरी क्‍लब ऑफ बीडच्या वतीने बायपास रोडवरील औरंगाबाद चौक व सोलापूर चौकात नामफ लकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रवि सानप, रविंद्र पेरगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

बीड शहरातून गेलेला सोलापूर-धुळे महामार्ग रुंदीकरणानंतर शहराबाहेरुन गेला. या रस्त्यावर औरंगाबादकडून बीडकडे येणार्‍या रस्त्यावर तसेच सोलापूरकडून बीड शहरात येणार्‍या रस्त्यावर कोणताही नामफ लक नसल्याने नव्याने या भागात येणार्‍या चालक-प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत होते. ही बाब लक्षात घेवून रोटरी क्‍लब ऑफ बीडच्या वतीने या दोन्ही चौकांमध्ये नामफ लक लावण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांना बीडकडे येतांना कोणताही संभ्रम राहणार नाही. या नाम फ लकाचा अनावरण सोहळा शनिवारी सकाळी 10 वाजता बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, माजी प्रांतपाल रो.हरिश मोटवाणी, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी, प्रोजेक्ट चेअरमन वाय.जनार्दन राव, संतोष पवार, अभय कोटेचा, शांतीलाल पटेल, प्रा.कृष्णा खांडे, संदिप खोड, सुनील खंडागळे, सुमित जैस्वाल, संकेत कदम ,ओमप्रकाश लोहिया ,राहुल कुलकर्णी ,सूरज लाहोटी आदी उपस्थिती होती.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here