यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषदेची खंबीर साथ – राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे

0
143

यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषदेची खंबीर साथ – राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे

– डिजिटल मिडिया परिषदेची दुसरबीड येथे बैठक संपन्न !

– बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या,

बुलढाणा/नारायण दाभाडे
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे अनेक जिल्ह्यांत शाखा स्थापन केल्या जात आहेत.आगामी काळात राज्यभरात काम करत असणारे यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेची खंबीर साथ असणार आहे असे मत डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक वृत्त असे की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक मा.एस.एम.देशमुख,
डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी दिनांक १० सप्टेंबर रोजी दुसरबिड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,पोलिस निरीक्षक श्री.वाघमारे,बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ, जिल्हा संघटक इंगोले यांच्यसह बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांच्या उपस्थितीत एक व्यापक बैठक घेण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व अतिथी गणांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातल्या यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे.त्यांच्या महत्वपूर्ण अडचणी सोडविल्या जाव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ हा देखील कसा मिळवता येईल यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात हजारों पत्रकार संघटीत आहेत.आपल्या देखील अडचणी सोडविल्या जाव्यात म्हणून प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन पदाधिकारी निवडी करण्याबरोबरच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांनी आता घाबरण्याचे कारण नाही.डिजिटल मिडिया परिषद आपल्या सोबत असणार आहे.त्याचबरोबर मराठी पत्रकार परिषदेची खंबीर साथ देखील आपल्या सोबत असणार आहे असे मत राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री.वाघमारे यांनी देखील उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. बैठकीच्या अनुषंगाने सुनिल अंभोरे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या चिखली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती पत्र देवून निवड जाहीर केली आहे.याप्रसंगी डिजिटल मिडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम वानखडे,जिल्हा संघटक नारायण दाभाडे,जिल्हा उपाध्यक्ष विनोद खंडारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कु.मोनाली,हनीफ शेख,कैलास आंधळे, समाधान भालेराव,एकनाथ माळेकर,शेख गणी कासम, शेख आरिफ शेख सत्तार,संदीप देवाई,पवन मगर,सुरेश हुसे,दत्तात्रय कायंदे,भगवान नागरे,अरुण तौर,अनिल दराडे,राजेंद्र डोईफोडे,नौशाद शेख अब्बास,शेख याकूब, डॉ.लक्ष्मीकांत जाधव,प्रतीक सोनपसारे,संदीप मस्के, शकील कुरेशी,संजय देशमुख,गुलशेर शेख,फकीरा पठाण,संतोष देशमुख,सुरज कुटे,भगवान नागरे,रमेश कोंढाणे,जीवन माळवे,संजय नागरे यांच्यासह मान्यवरांनी सुनिल अंभोरे यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.सुनिल अंभोरे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या चिखली तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबददल मेरा बुद्रुक सह पंचक्रोशीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here