वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न.
डोंगरचा राजा/आँनलाईन
मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका शाखा , डिजिटल मिडिया, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य,पत्रकार यांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दि.8 फेब्रुवारी गुरुवार रोजी परिषद कार्यालयात डिजिटल मीडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.यावेळी संघटना वाढीसाठी व पत्रकार यांच्या हिताच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांचे मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका शाखा अत्यंत चांगले काम करत असुन येणाऱ्या काळात हि संघटना वाढीसाठी व पत्रकार यांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्यासाठी दि.8 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 12.00 वाजता डिजिटल मिडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद कार्यालय वडवणी येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले यामध्ये जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंखे यांच्या सुचनेनुसार सन 2024 ते 2026 या वर्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला तसेच एस.एम.देशमुख सर यांचे वडील स्व.माणिकराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त 26 फेब्रुवारी रोजी देवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्या विषयी महत्वाचे नियोजन करण्यात आले तसेच पत्रकारांच्या विषयावर सविस्तर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले. तरी यावेळी बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल मिडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे, वडवणी तालुका अध्यक्ष अँड विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर काका पोटभरे, सचिव सतिषराव सोनवणे, कोषाध्यक्ष शांतिनाथ जैन, संपादक ओमप्रकाश साबळे, पत्रकार महेश राव सदरे, पत्रकार हरिभाऊ पवार, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार शंकर झाडे, पत्रकार धम्मपाल डावरे, पत्रकार वाजेद पठाण, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार संभाजी लांडे