गहिनीनाथ गडावर नेहरकर दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी.

0
32

गहिनीनाथ गडावर नेहरकर दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी.

– डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा.

डोंगरचा राजा ऑनलाईन – संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांच्या वतीने याही वर्षी संत वामनभाऊ समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

मूळ घाटशीळ पारगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई तुकाराम नेहरकर या दाम्पत्याने संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरमधून समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्याचा पायंडा सुरू केला आहे.

शनिवारी (दि.03) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाधी स्थळी मानाची महापूजा करण्यात आली, यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर हे ही उपस्थित होते.

दरम्यान पुण्यतीथी सोहळ्याची सांगता काल्याच्या हरिकीर्तनाने झाली. यावेळी संत वामनभाऊ यांच्या समाधीवर 11.45 वा नेहरकर दाम्पत्याने आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली.

या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील विविध विकासाच्या 23 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. संत वामानभाऊंचे हे तिर्थस्थळ अत्यंत पवित्र व चैतन्यमय असल्याचे म्हणत स्थळी हेलिकॉप्टर द्वारे केलेल्या पुष्पवृष्टीचे श्री फडणवीस यांनी विशेष असे कौतुक करून नेहरकर दाम्पत्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तसेच कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील नेहरकर दाम्पत्याच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here