राज्यात मोठा राजकीय भूकंप;शपथविधी ही झाला.

0
110

राज्यात मोठा राजकीय भूकंप;शपथविधी ही झाला.

ना.अजित पवार यांच्या जवळचे म्हणून ना.धनंजय मुंडे कडे पाहिले जाते.

– जिथे दादा तिथे आम्ही’ ! धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ..

मुंबई / डोंगरचा राजा आँनलाईन

राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या.

आज दुपारीच काही वेळापूर्व राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्यातच अजित पवार यांच्या जवळचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पहिले जाते. त्यांनीदेखील ‘जिथे दादा तिथे आम्ही’ म्हणत आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्यासह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here