चिखलबीडचे भूमीपुत्र बाळासाहेब मुंडे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
डोंगरचा राजा /आँनलाईन
वडवणी तालुका अंतर्गत बालाघाट डोंगररांगेत वसलेल्या चिखलबीड येथील सहशिक्षक बाळासाहेब यशवंत मुंडे यांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब मुंडे हे भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल वरठी, पं. स. मोहाडी येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अधिक वृत्तांत असा की, दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी रंगशारदा सभागृह, के.सी.मार्ग, रिक्लेमेशन, बांद्रा -मुंबई येथे सदरील पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते,या पुरुस्काराचे वितरण राज्याचे मंञी,ना. मंगळप्रभात लोढा, पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, मा. कपिल पाटील सदस्य विधानपरिषद, तसेच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव- रणजितसिंग देओल(भा.प्र.से.) यांचे शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. कृष्णकुमार पाटील -शिक्षण संचालक,( माध्यमिक व उच्चमाध्यमिक ) महाराष्ट्र, मा.कौस्तुभ दिवेगावकर -संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य,मा. कैलास पगारे-राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मा. महेश पालकर – शिक्षण संचालक, यौजना,मा. संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई. तसेच शालेय शिक्षण विभागातील अधीकारी यांचे उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रुपये 1लाख 10 हजार रुपये प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आदर्श व उपक्रमशिल शिक्षक श्री.बाळासाहेब मुंडे राजस्तरीय साविञीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल विविध स्तरातून अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी शुभेच्छा देऊन सन्मानित केले. तसेच चिखखबीचे विद्यमान सरपंच श्री विलास( बप्पा )वडणे, उपसरपंच विकास नेहरकर, माजी सरपंच विकास मुंडे, डोंगरचा राजा वृत्त पत्राचे संपादक अनिल वाघमारे,
सा.लोकमानसचे संपादक सतिष वाघमारे,बीड कारागृह अधीक्षक गंगाधर वडणे साहेब,प्रा,आदिनाथ मुडे, रामदास वडणे सर, प्रा. धर्मराज मुंडे,मा.उपसरपंच महादेव मुंडे,गुलाब वाघमारे (पो.पाटील),सतीश देशमुख सर, डाॅ,आत्माराम पुरी,सुरेश मुंडे सर,सुभाष लतिबे सर,लक्ष्मण वाघमारे सर,ग्रामसेवक बिभिषेन डोरले,बाबा होंडे,अशोक तांदळे सह गावच्या व परीसरातील लोकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.