सपोनी अमन सिरसट यांच्या मदतीने जखमी व्यक्तीचा जीव वाचला.

0
149

सपोनी अमन सिरसट यांच्या मदतीने जखमी व्यक्तीचा जीव वाचला.

– वडवणी पोलीस स्टेशन कडून ऋतुराज वाघमारे याच कौतुक.

वडवणी / डोंगरचा राजा आँनलाईन
वडवणी पोलीस स्टेशनचे नियुक्त पोलीस निरीक्षक अमन शिरसाट यांनी नुकतेच एका तरुणाने केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यथोचित सत्कार केला.

याबाबत अधिक वृत्त असे की वडवणी पोलीस स्टेशनला नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या घटने बद्दल ज्या युवक तरुणाने माहिती देऊन सामाजिक उपक्रम राबविला त्या युवकाचे कुठेतरी कौतुक करून भावी कामकाजासाठी पाठबळ देण्याच्या हेतूने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये त्या युवकाचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. शहरापासून जवळच असलेल्या चिंचवण धारुर रोडवर रेणुका माता मंदिराजवळ अगदी रस्त्याच्या कडेला दिनांक ४/७/२०२३ रोजी मंगळवारी संध्याकाळी ११ ते ११:३० वाजण्याच्या सुमारास एक ५५ वर्षे वयाचा इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने या मार्गावरून आपल्या खासगी वाहनाने प्रवास करणारा ऋतुराज महेंद्र वाघमारे या युवकाने वडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमन शिरसाठ यांना तातडीने मोबाईल वरून फोन करत संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. अगदी तत्परतेने पोलीस निरीक्षक अमन शिरसाठ यांनी एएसआय जायभाये,राम शिनगारे यांच्या मदतीने सदर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पहाडी पारगाव येथील सतिश दामोधर मुंडे वय वर्षे ५५ यास पोलिसांच्या गाडीत टाकून तातडीने उपचारार्थ दाखल केले आणि त्याचा जीव वाचवला.आज सतिश मुंडे हे अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच ऋतुराज महेंद्र वाघमारे या युवकाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अमन शिरसाट यांनी त्याचा पोलीस स्टेशन मध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन येथे सन्मान केला व पुढील सामाजिक उपक्रमासाठी पाठबळ दिले. यावेळी फौजदार प्रमोद यादव,डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विनायक जाधव, पत्रकार महेश सदरे, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार वाजेद पठाण त्याच बरोबर सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here