वडवणी तालुक्यातील शेतकरी अडचणीत;नगदी पीके भुय सपाट; गारपीटीमुळे फळबागांचेही मोठं नुकसान.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी तालुक्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा मोठा तडाका बसला.रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके अवकाळी पावसाने व गारपीटीमुळे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर फळबागा मध्ये आंबा सह आदी फळ बागाचे मोठं नुकसान झाले आहे.
वडवणी तालुक्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाका रब्बी हंगामातील पिकांना बसला.
या अवकाळी पावसाने वादळी वारे आणि गारपीट झाल्याने रब्बीची गहू, हरभरा, ज्वारी ही हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे पाण्यात गेली. तर फळबागा मध्ये आंब्यासह फळ बागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या कामी तातडीने उपाययोजना राबवुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होऊ लागली आहे..