बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी सतीश बियाणी.
डोंगरचा राजा / आँनलाईन
मुंबई : बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी परळी येथील मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे..मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज ही घोषणा केली.. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी यापुर्वीच विशाल साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. परिषदेने आज अन्य नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.. त्यात सरचिटणीसपदी गेवराईचे प्रा. राजेश बरकसे, कोषाध्यक्षपदी पाटोदा येथील छगनराव मुळे आणि प्रसिध्दीप्रमूख म्हणून बीड येथील संजय हांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. उर्वरित पदांच्या नियुक्तयांचे अधिकार अध्यक्ष विशाल साळुंके यांना देण्यात आले आहेत…एस.एम देशमुख यांनी नवनिर्वाचित पदाधिकारयांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..