खा.रजनीताई पाटील यांची राज्यसभेत काँग्रेसच्या प्रतोदपदी निवड.
– बीड जिल्ह्याचा काँग्रेस कडून पुन्हा बहुमान
प्रकाश मुडे | केज
खा. रजनीताई पाटील यांच्या खांद्यवर जम्मू काश्मिरच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. आता त्यांची राज्यसभेच्या प्रतोद म्हणून निवड करुन पुन्हा एकदा गांधी कुटुंबाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीने बीड जिल्ह्यात कॉंग्रेस पार्टीत उत्साह संचारला आहे.
राज्यसभेतील खासदार सौ. रजनीताई पाटील यांच्यावर या निवडीणे मोठी जबाबदारी वाढली असून त्यांना आता राज्यसभेत काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू करता येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्यसभेत त्यांच्या वर निलंबनाची कारवाई झाली होती. निलंबनाच्या कारवाई नंतर त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय राजकारणात एक आक्रमक चेहरा व गांधी घराण्यासी एकनिष्ठ म्हणून खा. रजणिताई पाटील यांच्या कडे पाहिले जाते.
खासदार रजनीताई पाटील यांची राज्यसभेत काँग्रेसच्या प्रतोद म्हणून निवड केल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली असून पक्षाने त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. खा. रजनीताई पाटील यांचेवर यापूर्वी देखील मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या होत्या. त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यानेच पक्षाने पुन्हा त्यांना राज्यसभेत ही मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. *केज शहरात देखील राहुल भैय्या सोनवणे, राजेसाहेब देशमुख, पशुपतीनाथ दांगट, प्रताप मोरे सर, प्रविण भाऊ शेप, बिपिनचंद्र ठोंबरे, कपिल मस्के, आमर पाटील, लक्ष्मण जाधव, मौला सौदागर, सुनील देशपांडे सर, समीर देशपांडे, शेखर सिरसट, अरुण गुंड, संतोष सोनवणे ,सचीन रोडे सह बहुसंख्य कार्यक्रत्यांनी या निवडीचे जोरदार स्वागत केले आहे.*