बीड रिपाइं कार्यालयाला मंत्री रामदास आठवले देणार भेट – पप्पू कागदे

0
157

बीड रिपाइं कार्यालयाला मंत्री रामदास आठवले देणार भेट – पप्पू कागदे

डोंगरचा राजा / आँनलाईन 

बीड येथील रिपाइं मध्यवर्ती कार्यालयाला रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले येत्या शुक्रवार (दि.10) मार्च रोजी सकाळी 10 वाजता भेट देणार आहेत.अशी माहिती रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले एका कार्यक्रमानिमित्त उस्मानाबाद येथे येत आहेत. त्या अनुषंगाने औरंगाबाद ते उस्मानाबाद असा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यानिमित्त बीड येथील रिपाइं मध्यवर्ती कार्यालयात ते आवर्जून भेट देणार आहेत.या दौऱ्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले समाजाचे प्रश्न आणि विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बीड येथील कार्यालयाच्या भेटीनंतर मंत्री रामदास आठवले उस्मानाबादकडे प्रस्थान करणार आहेत.अशी माहिती युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रसिद्धी माध्यमातून दिली.

चौकट

सत्काराचे योग्य नियोजन!

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सत्कारात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये म्हणून बीड रिपाइं मध्यवर्ती कार्यालयाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेवून नियोजन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here