वडवणी हद्दीतील 51 लाख रुपयेचा दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
– बीड स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ठ कामगिरी.
– वडवणी हद्दीतील व्यापाराऱ्यास आडवून 51 लाख रुपयेचा दरोडा टाकणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने उघड करुन सहा आरोपींना केले जेरबंद
डोंगरचा राजा/आँनलाईन
सोन्नाखोटा फाटयाच्या पुढे खडी क्रेशन समोर रोड वडवणी येथे दिनांक 07/02/2024 रोजी 1800 वा. सुमारास फिर्यादी शामसुंदर आण्णासाहेब लांडे, व्यवसाय-कापुस व्यापारी रा. घाटसावळी ता.जि.बीड हे माऊली जिनींग केज येथे 760 क्विंटल कापुस विक्री केलेले पैसे एकुण 51 लाख रु. आणण्यासाठी गेले होते व पैसे घेवून त्यांचे मोटार सायकल वरुन सोन्नाखोटा फाटाच्या पुढे खडी क्रेशन समोर रोडवर आले असता त्यांना पाठीमागून एक विनानंबरची हिरो कं.ची मो.सा. गाडीवरून तोंड बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीचे गाडीपुढे त्यांची मो.सा.आडवी लावली व लागलीच मागुन एक स्विप्ट कार जवळ येवून तोंड बांधलेले आणखीन तीन इसम फिर्यादीचे जवळ येवून सर्वांनी मिळून फिर्यादीस लाकडी काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीचे जवळील पैशानी भरलेली सॅग व मो.सा.चे पेट्रोल टँकवर ठेवलेल्या गोणीमधील पैसे बळजबरीने हिसकावुन लुटून घेवून वडवणीचे दिशेने पसार झाले होते. नमुद घटनेच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पो.ठा.वडवणी गुरनं 23/2024 कलम 395,394 भादंवि प्रमाणे दिनांक 08/02/2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा व पो.ठा.वडवणी यांना तात्काळ सदर गंभीर गुन्हयांचा तपास करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. सदरचा गंभीर दरोडयाचा गुन्हयातील आरापींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांनी पोउपनि संजय तुपे, पोउपनि सुशांत सुतळे व अंमलदार यांचे दोन पथके तयार करुन त्यांना गुन्हया अनुषंगाने अभिलेखावरील गुन्हेगारांची व गोपनिय माहिती काढुन आरोपींचा शोध घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
दोन्ही स्थागुशा पथकाने गुन्हा घडल्यापासुन केज, धारुर, तेलगाव, दिंद्रुड, सिरसाळा,आडस परिसरातील 30 ते 40 अभिलेखावरील गुन्हेगार, तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदाराद्वारे आरोपींचा शोध घेत असतांना पो.नि. श्री. संतोष साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा मैंद ता.केज गावातील बालाजी महादेव पुरी वय 21 रा. भवानीमाळ ता.केज (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून केला असून त्यापैकी तीन इसम हे आडस रोड परिसरात आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांनी तात्काळ दोन्ही पथकांना मार्गदर्शन करुन तपासाचे चक्रे गतीमान करुन आरोपींना पकडण्याचे आदेश दिल्यावरून पथकाने जुना आडस रोड परिसरात सापळा लावून 03 इसम नामे 1) शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे वय 21 रा. गोपाळपुर ता.धारुर, 2) बालाजी रामेश्वर मैद वय 20 वर्ष रा.मैदवाडी, ता.धारुर, 3) गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर वय 33 वर्षे रा.बाराभाई गल्ली, केज यांना ताब्यात घेवून त्यांना विश्चासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सदर लुटीचा गुन्हा हा माऊली जिनींग मधील मार्केट कमिटीचा कामगार 4) सुर्यकांत लक्ष्मण जाधव रा. केज याचे मदतीने 5) करण विलास हजारे वय 20 वर्षे रा.केज, 6) बालाजी रामेश्वर मैंद वय 20 रा.गोपाळपुरा, 7) संदिप वायबसे (फरार) यांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.
तपासात आरोपी बालाजी पुरी(टोळी प्रमुख) याचे प्लान वरुन जिनींग मधील काम करीत असलेल्या कामगाराच्या मदतीने जिनींग मोटार सायकल वरुन पैसे घेवून निघलेल्या फिर्यादीस निर्जन स्थळी सोन्नाखोटा फाटयाच्या पुढे खडी क्रेशर समोर रोड मो.सा. व स्विप्ट कारने आडवून मारहाण करून दरोडा टाकला असून दरोडयातील रक्कम आप-आपसात वाटून घेण्यासाठी प्रकरण शांत होई पर्यंत शांतीलाल मुंडे, गोविंद नेहरकर, संदिप वायबसे (फरार) यांचेकडे ठेवण्यात आली होती. तसेच गुन्हयात वापरलेली एच.एफ.डिलक्स मोटार सायकल ही टोळी प्रमुख बालाजी पुरी याने चोर केल्याचे निष्पन्न झालेले असून यासंदर्भात पो.ठा.केज गुरनं 07/2024 क.379 भादंवि प्रमाणे गुन्हयांची नोंद आहे.
सदर दरोडयाचा गुन्हा हा एकुण (07) आरोपीतांनी मिळून केला असून त्यापैकी (06) आरोपीतांना स्थागुशा पथकाने ताब्यात घेवून गुन्हयातील गेलामाल पैकी 41 लाख रुपये रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली स्विप्ट कार कि.अं. 04 लाख रुपये असा एकुण 45 लाख रुपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. धिरजकुमार बच्चु सहा.पोलीस अधीक्षक माजलगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संतोष साबळे, पोउपनि संजय तुपे, पोउपनि सुशांत सुतळे, पोह/कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, पोह/ रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, पोशि/बप्पा घोडके, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, पोह/रविंद्र गोले, देविदास जमदाडे, गणेश हांगे, चालक अतुल हराळे, गणेश मराडे यांनी केलेली आहे.