सिरसाळ्याच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेत कॅशियरने केला १९ लाखांचा अपहार.

0
97

सिरसाळ्याच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेत कॅशियरने केला १९ लाखांचा अपहार.

सिरसाळा / अतुल बडे

 – मॅनेजरची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार..

 – आत्महत्या करत असल्याचा मॅसेज करुन कॅशियर फरार..

येथील अंबेजोगाई पीपल्स बँक शाखेत कॅशयीर पदावर असणारे सुनील अशोक देशमुख यांनी १९ लांखाचा अपहार केल्याची तक्रार शाखा व्यवस्थापकांनी दिली आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत सिरसाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ९ मार्च रोजी कॅशियर सुनिल देशमुख सायंकाळ पासुन सिरसाळा येथून बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांचे बंधु प्रशांत अशोक देशमुख यांनी दिनांक १० मार्च रोजी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे येवून दिली. तक्रारीत प्रशांत देशमुख म्हणाले कि,

माझा भाऊ सुनील देशमुख यांने मोबाईल वर मेसेज केला की बँकेतील कर्मचारी पैशांचा घोटाळा करत आहेत व तो सर्व घोटाळा माझ्या अंगलट येणार असल्याने मी आत्महत्या करत आहे. दरम्यान कॅशियर देशमुख बेपत्ता झाल्याचे समजल्याने

बँक मॅनेजर यांनी बँकेत रक्कम तपासली असता १९ लाख रुपये तिजोरीतून गायप असल्याचे निदर्शनास आले असे समजते आहे. मॅनेजर इंगळे यांनी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे कॅशयर सुनील देशमुख यांच्या विरोधात अपहार प्रकरणी तक्रार दिली आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

चौकट

सुनील अशोक देशमुख हा 9 मार्च रोजी सिरसाळा येथील देशमुख गल्ली येथून हरवला असल्याची तक्रार त्याच्या मोठा भाऊ प्रशांत यांनी दिली होती तसा तपास देखिल करत असताना बँकेतून 19 लाख रुपयांचा अपहार केला असल्याचा बँकेतील कर्मचारी यांच्या तक्रारी वरून सुनील याच्या वर गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु आहे.त्या पद्धतीनें तपास सुरू आहे. – साह्ययक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here