मोफत गायन प्रशिक्षण वर्गाचे प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते उद्घाटन..
– डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – महाकवी वामनदादा कर्डक कला अकादमी बीड संचलित मोफत गायन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन0प्रा. प्रदीप रोडे यांच्या हस्ते दिनांक 12 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता नगर नाका, बीड येथे करण्यात आले. अद्यायावत संगीत वाद्य व साऊंड सिस्टिम असलेले हे संगीत दालन संगीत कलाकारांसाठी पर्वणी ठरणार आहे.यावेळी उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त अति. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक भैय्यासाहेब मोरे,मार्गदर्शक वा.क.क.मंच बीड प्रा.दिपक जमधाडे, प्रा.राम गायकवाड, प्रा.डॉ.नामदेव शिनगारे हे उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अकादमी चे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय कांबळे, सचिव सिध्दार्थ वाघमारे यांनी केले.उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना प्रा.रोडे यांनी महाकवी वामनदादाच्या गायकी बद्दल गौरव उद्गार काढले, ”गायकी मध्ये भारतात अनेक घरांणे आहेत त्यात आमच्या गायकांचे गायकी घराणे हे वामनदादा चे आहे असे त्यांनी सांगितले. प्रा.जमधाडे यांनी वामनदादा कर्डक कला मंच सोबत कायम साथ देण्याचे आश्वासन देऊन गायन क्षेत्र बद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात पी. व्ही.बनसोडे यांनी त्यांच्या वामनदादांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देऊन अध्यक्षीय समारोप केला. औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर बीड शहरातील गायकांची मैफिल आयोजित करण्यात आली होती.या मध्ये सुरवातीला वामनदादा कर्डक कला अकादमी बीड यांच्या संकल्पनेतून साकारली ते प्रा.शरद वंजारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीताने सुरुवात केली. नंतर या मैफलीत आयु.शाम माने,आयु.विनोद सवाई,प्राचार्य.डॉ.पांडुरंग सुतार, संतोषी लाहोटी, किशोरी मस्के,वैष्णवी जाधव यांनी गीते गायली तर सम्यक इणकर याने गीटार वाजवुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील गीताने उपस्थितांची मने जिंकली.याप्रसंगी पत्रकार संजय धुरंधरे, सोनू गायकवाड यांनी कार्यक्रमांची तांत्रिक बाजू यशस्वीपणे सांभाळून कार्यक्रमाची शोभा वाढविली.या उद्घाटन सोहळ्यात शहरातील अनेक मान्यवर, संगीत प्रेमी तसेच कला क्षेत्रातील मित्रपरिवार प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी आवर्जून हजेरी लावली होती.