एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत ज्योतीने अर्थसाहाय्य दिलेल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
– डोंगरचा राजा / आँनलाईन
एकूण 403 विद्यार्थ्यांना अंतिम यादीत स्थान, 34 विद्यार्थी हे पहिल्या शंभरात!
बीड – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता रु. 25,000/- प्रत्येकी अर्थसाहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते
महाज्योतीने सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता रु. 25,000 /- प्रत्येकी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 20-10-2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्याकरिता एकूण 439 उमेदवारांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र 437 विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या तयारी करिता प्रत्येकी रु. 25,000/- इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेचा निकाल दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाला आहे. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 437 विद्यार्थ्यांपैकी 403 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत यश मिळाले आहे. त्यातील 216 विद्यार्थी इतर मागासवर्ग, 39 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती – ब वर्गातील 23 विद्यार्थी, भटक्या जमाती – क मधील 70 तर भटक्या जमाती – ड मधील47 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे तसेच ८ विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना देखील अंतिम परीक्षेत यश मिळाले आहे.
एम.पी.एस.सी.च्या अंतिम यादीतील पहिला शंभरात 34 विद्यार्थ्यांना स्थान मिळाले आहे. या यशाआबाबत महा ज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.