मासे पकडण्याचे जाळे चोरीला ; रामभाऊ जीरे यांची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सौंदडवस्ती येथील रामभाऊ जीरे यांचे मासे पकडण्याचे जाळे चोरीला गेले असुन त्यांचे लेखी तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक केली नाही.हेच आरोपी रामभाऊ जीरे व कुटुंबातील सदस्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत.पोलीसांनी या आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी फिर्यादी रामभाऊ जीरे यांनी केली आहे.
याबाबत पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रामभाऊ जीरे यांनी म्हटले आहे की, वडवणी शहरापासून जवळच असलेल्या सौंदडवस्ती या ठिकाणी मी राहत असून माझा मासे पकडण्याचा व्यवसाय आहे. मासे पकडुन विक्री करतो.त्यातून मिळालेल्या पैशातून मी माझी व माझ्या कुटुंबाचा भुक भागवतो. दिनांक 17/ 3/ 2023 रोजी पहाटे साडेचार वाजता माझे मासे पकडण्यासाठी तलावात टाकलेले जाळे आरोपी माणिक सोनाजी कुलभाये, केसर सोनाजी कुलभाये,प्रियांका मानिक कुलभाये यांनी तिघांनी मिळून माशाचे जाळे घेऊन गेले व अनिल लुचारे यांचे घरी जाळे टाकले. व त्यातील काही माशांचे जाळे त्यांनी जाळून टाकून माझे नुकसान केले. मी त्यांना माझ्या जाळ्याचे नुकसान का केले असे विचारल्या वरून त्यांनी मला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यावरून वडवणी पोलिस स्टेशनमध्ये वरील तिघांविरुद्ध दि.18/3/2023 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 0057/2023 प्रमाणे कलम 504,506,34,427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी रामभाऊ जीरे यांनी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.