वडवणी मध्ये एसबीआयच्या बॅंक मॅनेजर ला मारहाण.?

0
83
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

वडवणी मध्ये एसबीआयच्या बॅंक मॅनेजर ला मारहाण.?

पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

डोंगरचा राजा /आँनलाईन
वडवणी या ठिकाणी असलेल्या एसबीआयच्या शाखेतील मॅनेजर श्री.युवराज सर्जेराव पाटील यांना मारहाण करण्यात आली असून मारहाण करणाऱ्या विरोधात वडवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दुपारपासून एसबीआय शाखेचे काम बंद असल्याने ग्राहकांना ताटकळत बसावे लागले. अनेक ग्राहकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

याबाबत डोंगरचा राजा ला पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वडवणी येथील स्टेट बँकेचे मॅनेजर युवराज पाटील यांनी पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी गत तीन वर्षापासून वडवणी येथील स्टेट बँकेत मॅनेजर म्हणून काम करतो आहे. दिनांक 24 जुन 2024 रोजी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे माझ्या केबिनमध्ये बँकेचे कामकाज करत असताना दुपारी 2 वाजुन 10 मिनिटांच्या सुमारास धनराज राजाभाऊ मुंडे, अरुण मुंडे असे दोघे परवानगी न घेता माझ्या केबिनमध्ये आले. मला म्हणाले की सही नमुना पडताळणी अर्जासाठी काय काय कागदपत्रे लागतात. व अश्विनी ट्रेडर्स हार्डवेअर यासाठी विचारणा करत होते. त्यावर मी त्यांना केवायसी डॉक्युमेंट्स उद्दम रजिस्ट्रशन फार्म ची पूर्तता करून घेऊन येण्यास सांगितले. त्यावर धनराज राजाभाऊ मुंडे,अरुण मुंडे राहणार वडवणी हे घेऊन येतोत असे म्हणून तेथून निघून गेले. थोड्यावेळाने परत आले व मला कागदपत्र दाखवले मी कागदपत्र चेक करत असताना काही त्रुटी निदर्शनास आल्या म्हणून मी त्यांना सांगत होतो की अश्विनी ट्रेडर्स ऐवजी श्रीहरी कंट्रक्शन झाले आहे. त्याचप्रमाणे नाव वेगळे व अकाउंट नंबर वेगवेगळे झाले आहेत.त्यावर त्यांनी असे कसे काय झाले.? सही का देत नाहीत?असे म्हणून माझ्यासोबत अरेरावीची भाषा करत घाण घाण शिवीगाळ केली. तसेच धनराज मुंडे यांनी संगणक सीपियु मॉनिटर उचलून माझ्या दोन वेळा डोक्यात अंगावर मारले व तोपर्यंत मी त्यांना समजावण्यासाठी पुढे झुकलो असता त्यांनी मला गालात चापट मारली.आमचा आरडाओरडा ऐकूण सिक्युरिटी गार्ड अरुण शिंदे धावत आले.त्यांनी पण समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला.सदर ईसमाने शासकीय साहित्य उचलून मारल्याने शासकीय मालमत्तेचे अंदाज 80 हजार रुपयांचे नुकसान करून जीवे मागण्याची धमकी देऊन तेथून ते निघून गेले. मी ड्युटीवर असून माझे कार्यालयात शासकीय काम करीत असताना माझ्या कार्यालयात येऊन मी चुकीच्या फाईलवर सही करावी असा आग्रह करून त्यास मी नकार दिला असता त्यांनी मला शिवीगाळ केली त्याप्रमाणे माझ्यावर हल्ला करून मला मारले व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.त्यामुळे मी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा झाला म्हणून माझी (१)धनराज राजाभाऊ मुंडे (२)अरुण मुंडे दोन्ही राहणार वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड यांचे विरुद्ध अशा प्रकारची तक्रार आहे. या तक्रारीनुसार वडवणी पोलीसात भादवी १८६० नुसार कलम ३५३,३३२,५०४,
५०६,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here